ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भायखळा:- गौरी गणपती विसर्जनातून सामाजिक बांधिलकीचा संदेश.
प्रतिनिधी करण शिंगाडे ताडदेव:-8652561172

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
दिनांक ५ सप्टेंबर रोजी गौरी गणपती विसर्जन होते. सर्वजण वाजत गाजत बाप्पाचे विसर्जन करण्यामध्ये मग्न होते. अशाच वेळी भायखळा मध्ये संघर्ष सदन, प्रभाकर नगर या सोसायटी मध्ये एक आगळा वेगळा प्रकारचा विसर्जन सोहळा पार पाडण्यात आला. सोसायटी मधील सर्व गणपती बाप्पा एकत्रित खाली आणून संपूर्ण सोसायटीने नाचत गाजत बाप्पांना निरोप दिला. सर्वांनी एकत्रित येऊन खूप छान असा कार्यक्रम पार पाडला आणि तसेच सर्वांना सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.