आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडगाव:- ज.स्वा.विद्या मंदिर वडगाव येथे शिक्षक दिनानिमित्त सत्कार सोहळा संपन्न.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

शिक्षक दिनानिमित्त आजी माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष डॉ. विकास घार्गे चेअरमन हुतात्मा मंडळ, व्हा. चेअरमन अंकुश घार्गे, सचिव रामचंद्र बरकडे, संचालक शिदोजीराव घार्गे, राजीव घार्गे ,अरुण जाधव, ज्ञानेश्वर कुंदन, सदस्य प्रताप घार्गे, माजी मुख्याध्यापक चव्हाण मॅडम, पुस्तके सर, मुजावर सर, संजय पिसाळ,व कुंदपसर ,डांगेसर, थोरात सर, पंडित मॅडम विद्यालयाचे प्राचार्य काळेसर, पर्यवेक्षक जे बी घार्गे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सत्काराचे आयोजन हु.मंडळा मार्फत होते. याच कार्यक्रमात NMMS परीक्षेत पात्र होऊन शिष्यवृत्ती मिळविलेल्या 5 विद्यार्थ्यांचे व सारथी शिष्यवृत्ती प्राप्त 12 विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा ,मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांनी केले. या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून अध्यापनाचा आनंददायी अनुभव घेतला.

५ सप्टेंबर , शिक्षक दिन सोहळा काल आपल्या शाळेमध्ये संपन्न झाला .आपल्या गुरुंनी आपल्याला सुशिक्षित व सुसंस्कृत केले .शाळेत सेवेवर रुजू होताना सर्व शिक्षकानी सुरवातीच्या महिन्यात स्वतःचा पगार शाळेच्या भौतिक सुविधा निर्मिती साठी दिला. सेवानिवृत्त होतानाही शिक्षक शाळेला आर्थिक मदत करतात.काल शिक्षक दिनाला आपल्या शाळेतून निवृत्त झालेले शिक्षक आदरणीय घाडगे सर यांनी ₹ ३०००० व आदरणीय पिसाळ सर यांनी ₹ ५१००० देणगी शाळेला दिली आहे .शाळेसाठी तन , मन आणि धन
अर्पण करणाऱ्या गुरूंना सादर प्रणाम.
🙏🙏🙏💐💐💐

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button