ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-पत्रकारांच्या संगणकाचे की पॅड श्री.छ.खा.उदयनराजे भोसले (महाराज )—————

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

पत्रकारांच्या संगणकाचे की पॅड श्री.छ.खा.उदयनराजे भोसले (महाराज )—————

प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही नैसर्गिक रित्या होत असते. परंतु त्यांची कर्तबगार वागणं. बोलणे.हे त्यांना लोकप्रिय बनवत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज व महाराष्ट्रातील अनेकांचे आश्रयदाते व आयडॉल श्री छ खासदार उदयनराजे भोसले तथा महाराज यांचा आज दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी वाढदिवस आहे .या वाढदिवसाच्या निमित्ताने सामान्य माणसात राहणाऱ्या व्यक्तीपासून ते हवेलीमध्ये राहणाऱ्या राजे राजवाडे व श्रीमंतांपर्यंत आज शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
एखाद्या व्यक्तीबद्दल आदर युक्त भाव त्या व्यक्तीभोवती गिरट्या घालत असतो. आज छत्रपती उदयनराजे भोसले तथा महाराज हे खऱ्या अर्थाने वटवृक्ष म्हणूनच वावरत आहेत. या वटवृक्षाच्या पारंब्या सुद्धा विस्तारलेले आहेत. म्हणूनच त्या कायम खोलवर जनतेच्या मनात रुजलेले आहेत .या वटवृक्षाच्या शेजारी अनेक अशोकाची झाडे उभी राहिली आणि केव्हा नष्ट झाली हे सुद्धा कुणाचे लक्षात येणार नाही. कारण, वटवृक्षाच्या पारंब्या खूप खोलवर पसरलेले आहेत अगदी उदाहरण द्यायचे झाले तर सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील वटवृक्ष व त्याच्या पारंब्या या आता आजूबाजूच्या परिसरातही पसरलेले आहेत. त्यामुळे कडक उन्हातही सूर्यप्रकाश खोलवर जाऊ शकत नाही एवढी सावली निर्माण झालेली आहे.
श्री छ खा उदयनराजे भोसले यांची प्रचंड लोकप्रियता अफाट आहे. इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व व देखणे व्यक्तिमत्व हे प्रथम दर्शनी छाप पाडणारे आहे. त्यामुळे त्याची फारशी चर्चा होताना दिसत नाही परंतु त्यांच्या निर्भीड व जिद्दी आणि धाडसी स्वभावाची मात्र चर्चा होते. प्रसारमाध्यमातून त्यांच्याबद्दल असणारे आकर्षण कधीही लपून राहिलेले नाही. महाराष्ट्रात अनेक मेळावे, आंदोलने व जाहीर सभा होतात पण खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती ही बातमीची हेडिंग असते. एवढी अफाट लोकप्रियता त्यांना मिळालेली आहे. एखाद्या दगडाला घाव घालून त्याची मूर्ती बनवली जाते परंतु श्री छ खा उदयनराजे यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांच्या पाषाणामधील आजूबाजूला असलेले दगडाचे तुकडे बाहेर काढून त्यातील मूर्तीचे दर्शन घडवले आहे. मूर्तीमुळे अनेकांचे भले झालेले आहे किंबहुना श्री छ खा उदयनराजे भोसले यांच्या सावली शेजारी उभे असणाऱ्यांची ही सावली खूप मोठी वाटू लागलेली आहे. पण उदयनराजे बाजूला झाले तर या सावल्यांचे रक्षण दाते उरत नाही हे अनेकांना पटलेले आहे. लहान मुलांचे व चॉकलेटचे आकर्षण असलेल्या महाराजांनी आतापर्यंत लाखो फोटो व सेल्फी काढून दिलेले असतील एखाद्या चित्रपटातील गायक अथवा राजकारणी व्यक्ती पेक्षाही महाराजांची लोकप्रियता अफाट आहे .आजही त्यांच्या लोकप्रिय ते बाबत अनेकांना स्वप्न पडत असतात. त्यांनी घेतलेले निर्णय हे कधी कधी चुकीचे असतात पण त्यांच्या निर्णयावर त्याची लोकप्रियता अवलंबून नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.
काही निर्णय घेताना सल्लागार मंडळी सुद्धा घातक ठरतात. याचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. योग्य वेळी किती चुकीचा निर्णय देणे. हे जरी सल्लागारांचे काम असले तरी सल्ला स्वीकारणे की नाही ? हे सर्वस्वी त्यांच्या हातात असते. आगामी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवार म्हणून मतदार सुद्धा त्यांच्याकडे पाहतात. त्यांना मत देण्यासाठी उत्सुक आहेत. आता प्रश्न उरतो तो म्हणजे कोणत्या चिन्हावर ते निवडणूक लढवणार ? यावर सुद्धा बरेच अवलंबून आहे. हे आता स्पष्टपणे नमूद करावे वाटत आहे. त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देताना पत्रकार म्हणून त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं त्यांनी दिलेले उत्तर हे अभ्यास वर्ग म्हणून पाहिले जाते. आज खरं म्हणजे त्यांच्या कृपेने सातारा शहरात भव्य दिव्य असे पत्रकार व साहित्य भवन उभे राहिलेले आहे .चार मजली या भवन मध्ये डोळ्याची पारणे फिटाली व दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांच्याबद्दल खूप मोठ्या आशा आकांक्षा निर्माण झालेले आहेत. त्यांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये त्यांच्या कुटुंबीयातील सर्व सदस्य त्याचबरोबर जिवाभावाचे मावळे अशी अनेक नावे घेतली तर वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर अनेक युवक कार्यकर्ते आज त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेत आहेत त्यांना निश्चितच यश मिळणार आहे. यासाठी त्यांनीही अभ्यासपूर्ण व वस्तुनिष्ठ माहिती देणाऱ्या सल्लागारांचा सल्ला घ्यावा. एवढीच माफक अपेक्षा आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा…….
——- पत्रकार अजित जगताप, सातारा 9922241299
_________________________________

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button