सातारा:-विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संत दर्शन संत संवाद बैठक.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संत दर्शन संत संवाद बैठक.
सातारा दि: सातारा जिल्ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धार्मिक – सामाजिक- शैक्षणिक दृष्ट्या हिंदू बांधवांना संघटित करण्याचा व सन्मानाने स्वधर्मात परत आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानिमित्त बैठक होत आहे.
शनिवार दिनांक १२ एप्रिल रोजी दुपारी एक ते तीन वाजता सुपेकर हॉल, यादव गोपाळ पेठ, गोल मारुती शेजारी, सातारा शहर या ठिकाणी सकल संत सातारा जिल्हा आणि विश्व हिंदू परिषद आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अलोक कुमारजी, विश्व हिंदू परिषद क्षेत्रीय धार्मिक विभाग प्रमुख माननीय श्री संजय जी मुद्राळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होत आहे.
या बैठकीला ह भ प विठ्ठल महाराज मठाधिपती श्री जयराम स्वामी वडगाव तसेच विश्व हिंदू परिषद सातारा जिल्हा मंत्री विजय गाढवे ,कराड जिल्हा मंत्री संतोष पांडे यांच्यासह संपर्क प्रमुख राजू जी दीक्षित उपस्थित राहणार आहेत.
या विश्व हिंदू परिषद आयोजित केलेल्या संवाद साधण्यासाठी तसेच हिंदू धर्म व संस्कृती रक्षणाचे मोलाचे कार्य हातून घडावे या संवादाच्या माध्यमातून एकात्म भाव वाढावा यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रमुख साधू संतांचे मार्गदर्शन मिळणार आहे .या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या १९६९ साली उडपी कर्नाटक या ठिकाणी हिंदू धर्मशास्त्र अस्पृश्यतेला कोणतेही स्थान नाही. तर हा अभिशाप संपुष्टात येऊ शकतो. असा प्रस्ताव उडपी येथील आयोजित संत संमेलनात भारतातील प्रमुख संतांच्या द्वारे सर्व संमतीने पारित केला गेला होता. अस्पृश्यता संपविण्याच्या दृष्टीने एक सार्थक महत्वपूर्ण प्रयत्न याचा प्रारंभ झाला. असे विश्व हिंदू परिषद मानत आहे.
गोरक्षा, हिंदू धर्मप्रसार ,जनजागरण अभियान, विश्व समन्वयी, श्रीराम जन्म भूमी मुक्ती आंदोलन, अमरनाथ यात्रा, अमरनाथ यात्रा, मठ मंदिर संपर्क, समरसता विभाग आणि राम सेतू रक्षाबंधन, श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियान, असे अनेक विधायक उपक्रम राबविण्यात येत आहे.
विश्व हिंदू परिषद संपर्क विभाग पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील अध्यक्ष पांडुरंगराव राऊत, संजय मुद्राळे प्रांत मंत्री व किशोर चव्हाण संपर्कप्रमुख यांच्यासह सातारा जिल्ह्यातील अतुल शालगर, जितेंद्र वाडेकर ,मोहन साठे ,रवी कोठाळे यांच्या सह विश्व हिंदू परिषदेचे परिवार ही बैठक यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.