जावळी:-सायगावच्या कालव्यात पोहण्यासाठी जर्मन शेफर्ड कुत्र्याची धमाल…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सायगावच्या कालव्यात पोहण्यासाठी जर्मन शेफर्ड कुत्र्याची धमाल…..
सध्या उन्हाळ्याचे तापमान ४२ सेल्सिअस अंशापर्यंत गेल्यामुळे सावलीच्या शोधासाठी अनेक जण धाव घेतात. सध्या जावळी तालुक्यातील सायगाव येथे धोम धरणाच्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे अनेकांना गारवा मिळत आहे. परंतु , उन्हाळा सण होत नसल्याने जर्मन शेफर्ड कुत्र्याला या कालव्यात पोहण्यासाठी घेऊन जावे लागत आहे. या कुत्र्याची धमाल सध्या लोकप्रिय ठरली आहे.
सायगाव तालुका जावळी येथील माजी उपसरपंच भानुदास पवार यांनी महाबळेश्वर येथून एक लहान जर्मन शेफर्ड जातीचे पिल्लू आणले होते. आज त्याची चांगल्या पद्धतीने निगा राखली जात आहे . उन्हाळ्यामध्ये त्याला त्रास होऊ नये. याची काळजी घेण्यासाठी सध्या धोम धरणाच्या कालव्यामध्ये हा जर्मन शेफर्ड डुबक्या मारत आहे. सदर जर्मन शेफर्ड च्या डुबक्या पाण्यासाठी सायगाव परिसरात शॉनप्रेमी गर्दी करत आहे. इतर वेळेला त्याला मर्ढे या ठिकाणी कृष्णा नदीकडे घेऊन जावे लागते.
जर्मन जातीच्या या जर्मन शेफर्ड ज्याला ब्रिटनमध्ये अल्सेशियन म्हणून देखील ओळखले जाते. ही जात मॅक्स वॉन स्टेफनिट्झ यांनी १८९९ पासून विविध पारंपारिक जर्मन पाळीव कुत्र्यांचा वापर करून विकसित केली होती .जर्मन शेफर्ड या कुत्र्याची इतर नावे म्हणजेअल्सेशियन,अल्सेशियन लांडगा कुत्रा,ड्यूचर शेफरहंड,अल्तडॉइश शेफरहुंडे, अशी सुद्धा आहेत.
मूळ जर्मनी या कुत्र्याची उंची ६० ते ६५ सेंटिमीटर आणि वजन ३० ते४० किलो असते.
सायगाव येथील जर्मन शेफझर्ड जातीची बॉबी नावाची मादी असलेला हा कुत्रा बौद्ध वस्ती नजीक असलेल्या धोम धरणाच्या कालव्याच्या रस्त्यालगतच्या कट्ट्यावर येऊन कालव्यातील पाण्यात उडी मारतो आणि पाण्यामध्ये निवांतपणाने पोहत बसतो. या कालव्यावर कपडे धुण्यासाठी व आंघोळ करण्यासाठी अनेक जण येतात. परंतु, कुणालाही तो त्रास देत नाही. उलट पुलावरून डुबकी मारण्यामध्येच त्याला आनंद वाटतो.
जर्मन शेफर्ड हे सर्वसाधारणपणे खेळकर आणि उत्साही असतात. बहुतेक मुले आणि ज्येष्ठांसाठी चांगले साथीदार असतात. ते समर्पित, जागरूक आणि संरक्षक कुटुंबातील सदस्य असतात आणि ही जात पहारेकरी किंवा संरक्षण कर्तव्यांसाठी सर्वोत्तम आहे. जर्मन शेफर्डना बहुतेकदा सैन्य आणि पोलिस दलांकडून पळून गेलेल्यांचा शोध व बचाव कार्यामध्ये मदत करण्यासाठी आणि बेकायदेशीर ड्रग्ज शोधण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. जर्मन शेफर्ड प्राणी विविध भाषेतील चित्रपटात आणि दूरदर्शनच्या अनेक मालिकांमध्ये दिसून येतो.
सातारा जिल्ह्यात पाच हजारापेक्षा जास्त जर्मन शेफर्ड श्वान आनंदाने पाळला जातात .परंतु, सायगाव या ठिकाणी इतर पाळीव प्राण्याप्रमाणेच या जर्मन शेफर्ड च्या वागणुकीमुळे सर्वांचा तो लाडका बनला आहे. मुक्या प्राण्यांवर ती मर्जी राखण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे प्रसिद्ध प्राणी मित्र मदन खंकाळ, अजित जगताप व इतरांनीही या जर्मन शेफर्ड चे कौतुक केले आहे.