मुंबई:-माटुंगा लेबर कॅम्पमध्ये काँग्रेसतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

23 नोव्हेंबर 2025
मुंबई:-माटुंगा लेबर कॅम्पमध्ये काँग्रेसतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी महेंद्र साळवे यांनी माटुंगा लेबर कॅम्प, वॉर्ड १८९ येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले. जीवन वाचवण्याच्या या पवित्र कार्यात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. समाजसेवेचा आदर्श रक्ताच्या कमतरतेमुळे कोणाचेही जीवन धोक्यात येऊ नये, या उदात्त हेतूने साळवे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ या भावनेने परिसरातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग नोंदवला. यावेळी वॉर्ड क्रमांक 189 च्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार पुष्पा महेंद्र साळवे देखील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना पुष्पा महेंद्र साळवे म्हणाले, “रक्तदान हे केवळ दान नसून ते एक जीवनदान आहे. माटुंगा लेबर कॅम्पच्या नागरिकांनी दाखवलेला उत्साह कौतुकास्पद आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच सामाजिक बांधिलकी जपतो आणि गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असतो.” आम्ही नेहमीच जनतेची सेवा केली, आताही करत आहोत आणि यापुढे देखील करत राहणार. आरोग्य पथकाचे या शिबिरासाठी विशेष सहकार्य केले. सर्व रक्तदात्यांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, या शिबिरात शेकडो रक्त युनिट्स गोळा करण्यात आले, ज्यामुळे रक्तपेढ्यांना मोठा आधार मिळाला आहे. या यशस्वी आयोजनाबद्दल वॉर्ड 189 मधील नागरिकांनी महेंद्र साळवे यांच्या समाजोपयोगी कार्याचे अभिनंदन केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
कांग्रेस का ब्लड डोनेशन कैंप संपन्न.
मुंबई कांग्रेस के जनरल सेक्रेटरी महेंद्र सालवेने वार्ड 189 के माटुंगा लेबर कैंप में एक बड़ा ब्लड डोनेशन कैंप सफलतापूर्वक लगाया। वहां के लोगोंने इस पवित्र काम में अपनी मर्ज़ी से हिस्सा लिया और ब्लड डोनेट किया। सालवेने यह कैंप इस नेक इरादे से लगाया था कि समाज सेवा के आदर्श की वजह से किसी की जान खतरे में न पड़े। ‘ब्लड डोनेशन सबसे अच्छा डोनेशन है’ की भावना के साथ, इलाके के बड़ी संख्या में युवाओं, महिलाओं और बुजुर्गोने कैंप में हिस्सा लिया। इस मौके पर वार्ड नंबर 189 से कांग्रेस की इच्छुक उम्मीदवार पुष्पा महेंद्र साल्वे भी मौजूद थीं। इस मौके पर पुष्पा महेंद्र साल्वे ने कहा, “ब्लड डोनेशन सिर्फ डोनेशन नहीं है, यह जीवन का दान है। माटुंगा लेबर कैंप के लोगों ने जो जोश दिखाया, वह तारीफ के काबिल है। कांग्रेस पार्टी हमेशा सोशल कमिटमेंट रखती है और जरूरतमंदों की मदद के लिए तैयार रहती है।” हमने हमेशा लोगों की सेवा की है, अभी कर रहे हैं और आगे भी करते रहेंगे। इस कैंप के लिए हेल्थ टीम ने खास सहयोग दिया। सभी ब्लड डोनर्स की जांच की गई और उन्हें सर्टिफिकेट और गिफ्ट दिए गए। मिली जानकारी के मुताबिक, इस कैंप में सैकड़ों यूनिट ब्लड इकट्ठा हुआ, जिससे ब्लड बैंकों को काफी मदद मिली है। इस सफल इवेंट के लिए वार्ड 189 के लोगों ने महेंद्र सालवे को उनके सोशल सर्विस के काम के लिए बधाई दी और भविष्य में भी ऐसे कामों में साथ देने का वादा किया।




