वाई तालुका आणि आसपासच्या भागांमध्ये सुरू असलेल्या अनाधिकृत व्यवसाय बंद करण्याचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा वाई प्रांताधिकार्यांना निवेदनाद्वारे इशारा.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई तालुका आणि आसपासच्या भागांमध्ये सुरू असलेल्या अनाधिकृत व्यवसाय बंद करण्याचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा वाई प्रांताधिकार्यांना निवेदनाद्वारे इशारा.
वाई तालुका आणि आसपासच्या भागांमध्ये सुरू अनधिकृत दारू विक्री, मटका जुगार व्यवसाय ,चक्री जुगार, फन टार्गेट जुगार करणाऱ्यांवर कारवाई करून अनधिकृत धंदे बंद करा आणि मौजे सुलतानपूर हद्दीत गट नंबर 2/1/2/3/4/5अवैधरित्या उत्खनन करून प्लॉटिंग करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करा अन्यथा येत्या दहा दिवसानंतर आंदोलन करणार महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा प्रांत अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा.
वाई तालुक्यांमध्ये तसेच शेजारचा खंडाळा तालुका व महाबळेश्वर तालुक्यामध्ये राजरोसपणे युवा पिढी नशेच्या अधीन जात आहे आणि याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे भागात सुरू असणारा अनधिकृत मटका , जुगार, चक्री जुगार, फन टारगेट जुगार . याला बळी पडून मोठ्या प्रमाणावर सामान्य लोक देशोधडीला लागले आहेत. यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहे, तर ही हे सर्व धंदे तात्काळ बंद होणे हे आता सध्याच्या काळाचे गरज बनली आहे यापूर्वीही राजेंद्र जाधव प्रांत असताना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर धंदे बंद करण्याची मागणी जोर लावून धरली होती मात्र काही दिवस बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा डोके वर काढून बसले आहेत त्यामुळे सदर धंदे तात्काळ बंद करून असे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करावे तसेच मौजे सुलतानपूर येथील गट नंबर 2/1/2/3/4/5 विनापरवाना अवैद्यरित्या वाईच्या नायब तहसीलदार घोरपडे यांचे नाव सांगून उत्खनन करून प्लॉटिंग करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करा अन्यथा या दोन्ही विषयांवर कोणती कारवाई न दिसल्यास दहा दिवसानंतर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष आयोग किरण दादा बगाडे यांच्या मार्गदर्शनानुसार बेमुदत आंदोलन करणार असा इशारा महाराष्ट्र रीपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला.
निवेदन देताना वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे, सातारा जिल्हा संघटक विकास दादा जाधव, वाई तालुकाध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई तालुका युवक अध्यक्ष आकाशभाई गायकवाड, शहराध्यक्ष रणवीर परदेशी, तुषार भोरकडे,बापू शिंदे,अशोक कदम आणि कार्यकर्ते उपस्थित होते.