Rps स्टार न्यूजचा दणका-थरमॅक्स चौकातील समस्येचे झाले निराकरण.
प्रतिनिधी:- शफिक शेख निगडी:-9767275783

RPS स्टार न्यूजचा दणका
थरमॅक्स चौकातील समस्येचे झाले निराकरण.
पुणे, दि. 30, (शफिक शेख):- “थरमॅक्स चौक बनला वाहनचालकांसाठी कर्दनकाळ” या मथळयाखाली दि. 6 ऑगस्ट 2022 रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत अनेक पाठपुराव्यानंतर मा. आयुक्त यांच्या आदेशाने सदर ठिकाणच्या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली आहे. या कामाबद्दल ‘आरपीएस स्टार न्यूज’चे येथील नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.
थरमॅक्स चौक हे चारही चौक मिळण्याचे एक मुख्य ठिकाण असताना येथील सिग्नलवरचे रस्ते हे अनेक ठिकाणी नादुरूस्त होवून ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया, लहान मुले, वाहनचालक यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत होता. त्यामुळे येथील नागरिकांनी आमचे प्रतिनिधी शफिक शेख यांच्याकडे सदर प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली असता. त्यांनी या ठिकणी भेट देवून पूर्ण बातमी तयार केली त्यास न्याय देत आरपीएसचे मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण यांनी सदर बातमी प्रसिद्ध केली.
बातमी प्रसिद्ध होवूनही त्यावर कारवाई होत नसल्याने त्या बातमीचा संदर्भ देत आमचे प्रतिनिधी श्री. शफिक शेख यांनी नवनियुक्त आयुक्त श्री. शेखर सिंह यांना विनंती केली. त्याची त्यांनी तात्काळ दखल घेत संबंधितांना कारवाई आदेश दिले. आणि आज रोजी सदर थरमॅक्स चौकातील या मुख्य रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली याबाबत मा. आयुक्तांचे सर्व स्तरांतून आभार व्यक्त होत आहे.
याकामी सदर चौकातील वाहतूक विभागाचे एएसआय श्री. शांताराम उभे, आम आदमी पार्टीच्या महिला विंग उपाध्यक्षा सौ. मैमुना शेख आणि सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला मुकरताल यांनी सहकार्य केले.