भिवडी/चांदवडी (ता.वाई) येथील महादेव मंदिरात आज श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
भिवडी/चांदवडी (ता.वाई) येथील महादेव मंदिरात आज श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस.
दि.२६ रोजी पहाटेपासूनच मंदीरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पहायला मिळत होती. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी महादेव मंदीरात भिवडी व चांदवडी या दोन्ही गावांमध्ये मिळुन श्रावण महिण्यातील हा शेवटच्या दिवसाच्या भंडाऱ्याचा धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. मोठ्या उत्साहाने एखाद्या जोडप्याच्या हातुन हा अभिषेक घालुन महापुजा व महाप्रसाद करण्यात येतो. प्रत्येक वर्षी सर्व भाविक मोठ्या संख्येने लांब लांबहुन या ठिकाणी दर्शनासाठी हजर राहतात व महाप्रसादाचा लाभ घेतात. हा महाप्रसाद दूपारी चालू होतो आणि रात्री ११ वाजेपर्यंत चालु राहतो.
हे मंदिर पाच पांडवांच्या काळातील असल्याचे जूने लोक सांगतात. पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधले आहे या मंदिराला कळस बसवलेला नाही पांडवांना हे मंदिर एका रात्रीत बांधुन पूर्ण करायचे होते पण पहाट होऊन कोंबडा आरवल्यामुळे मंदिराला कळस न बसवता पांडव निघुन गेले असे ही म्हटले जाते. मंदिराची बांधणी अतिशय जुन्या व साध्या पद्धतीने दगडी बांधकामातुन करण्यात आलेली आहे. मंदिरातील जी महादेवाची पिंड आहे ती स्वयंभू (म्हणजे आपोआप तयार झालेली ) आहे असे म्हटले जाते. या मंदिरात चित्रपट / मराठी मालिका यांचे देखील शुटींग करण्यात आले आहे .