कुरवली बुद्रूक येथे ग्रामसभेमध्ये अवैध धंदे वरुन गोंधळ.
प्रतिनिधी समीरखान पठाण फलटण:-9766685375

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
कुरवली बुद्रूक येथे ग्रामसभेमध्ये अवैध धंदे वरुन गोंधळ.
फलटण प्रतिनिधी / समीर पठाण
कुरवली बुद्रूक मध्ये अवैध धंदे फोफावले असुन , कोणीही दारूचा विषय काढला तर त्यालाच धमकावले जाते .जिवे मारण्यांची धमकी दिली जाते . ग्रामसभेत धनाजी दामू कुंभार यांने दारू विषयी तक्रार केल्यावर पप्पुलाल नजीर मेटकरी यांने त्याला जिव मारण्याची धमकी दिली.पप्पूलाल नजीर मेटकरी याचा दारु विक्रीचा व्यवसाय आहे. त्यावर या अगोदर संबंधीत पोलीस स्टेशनला भरपुर तक्रार व गुन्हे नोंद आहेत . संबंधित व्यक्ती ने दारुची तक्रार ग्रामपंचायत कडे केल्यावर त्यांनी ग्रामपंचायत लेटरपॅड वर दारूची तक्रार संबंधित विभागाकडे पाठविले.तर आता दारू विक्री बंद होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे .त्यांच्या विषयी कोणीही तक्रार दिली तर त्याला धमकावले जाते .व त्यांच्या घरच्या लोकांना जिवे मारण्यांची धमकी दिली जाते . त्यासाठी दारू विक्रीते यांची कोण तक्रार करत नाही .