पुणे:-तृतीय पंथीयांसोबत रक्षाबंधन साजरे करून समाजासमोर एक वेगळा आदर्श -फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या गोरान ग्रोसकोफ फॅमिली क्लिनिकचा स्तुत्य उपक्रम.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकूर:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
तृतीय पंथीयांसोबत रक्षाबंधन साजरे करून समाजासमोर एक वेगळा आदर्श. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या गोरान ग्रोसकोफ फॅमिली क्लिनिकचा स्तुत्य उपक्रम.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या गोरान ग्रोसकोफ फॅमिली क्लिनिक या सामाजिक संस्थेने मंगळवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या गोरान ग्रोसकोफ फॅमिली क्लिनिक पुणे येथे तृतीयपंथीसाठी रक्षाबंधनचा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला. समाजात तृतीयपंथीना कायमच घृणा, अवहेलना, अत्याचार, आणि हिन दर्जा ची वागणूक मीळत असते, त्यांच्याकडे तुच्छ नजरेने पाहिले जाते. शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधीपासून हे लोक कायमच वंचित असतात. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या हक्काचे रक्षण करणे हे समाजाचे कर्तव्य आहे , ही जाणीव आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
या मध्ये १५ तृतीयपंथी भगिनी आणि ३ दृष्टीहीन मुलींनी सहभाग घेतला होता तसेच त्यांनी कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्वांना राख्या बांधल्या.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक चंदूशेठ कदम, प्रमुख पाहुणे रोटरी क्लब पुणे रॉयलचे अध्यक्ष राजेंद्र सराफ , जनकल्याण समिती पुणेचे कार्यवाह संदीप गुजर, गोरान ग्रोसकोफ फॅमिली क्लिनिकच्या अध्यक्षा फ्रेनी तारापोर, नितीन दळवी इ. मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक चंदूशेठ कदम यांनी एका तृतीयपंथी भगिनीला दत्तक घेऊन तीच्या शिक्षणासाठी , नोकरीसाठी मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच वेगवेगळ्या सुविधा मिळविण्यासाठी तृतीयपंथीना संगठीत होण्याचे आवाहन ही केले.
गोरान ग्रोसकोफ फॅमिली क्लिनिक मार्फत आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
संदीप गुजर यांनी जनकल्याण मार्फत सर्वतोपरी मदत देण्यात येईल फक्त एकजुटीने प्रयत्न करा असा संदेश दिला.
राजेंद्र सराफ यांनी रोटरी क्लब पुणे रॉयल मार्फत वेगवेगळे प्रशिक्षण आणि जनजागृती करणार असल्याचे सांगितले.
शेवटी समाजामध्ये वावरताना तृतीयपंथीना ज्या अवहेलनेला सामोरे जावे लागते त्यापासून रक्षण करण्याचे आश्वासन सर्वांनी दिले.