पिंपरी-चिंचवडमधील हातगाडीवाले, पथारीवाले यांच्या बायोमेट्रिक सर्व्हेक्षणासाठी केवळ 10 दिवस बाकी.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी:-9767275783

पिंपरी-चिंचवडमधील हातगाडीवाले, पथारीवाले यांच्या
बायोमेट्रिक सर्व्हेक्षणासाठी केवळ 10 दिवस बाकी.
पुणे, निगडी, दि. 20 (शफिक शेख):- पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन मा. श्री. राजेश पाटील यांच्या आदेशान्वये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पथारी, हातगाडीवाले, स्टॉल, टपरीधारक यांच्यापैकी ज्यांनी सन 2012 व 2014 मध्ये सर्व्हेक्षणासाठी अर्ज केला होता आणि ज्यांच्याकडे त्या अर्जाची पावती आहे अशा फेरीवाल्याचे बायोमेट्रिक सव्हेक्षण दि. 25/07/2022 ते 30/08/2022 पर्यंत महानगरपालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या आठही प्रभाग/क्षेत्रीय कार्यालयामध्ये होणार आहे. तरी संबंधित पात्र फेरीवाल्यांनी या संधीचा लाभ घेवून कागदपत्रांसह या कार्यालयांमध्ये जावून सर्व्हेक्षण करून प्रमाणपत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर सर्व्हेक्षण हे ज्यांनी 2012 व 2014 मध्ये अर्ज केला होता आणि ज्यांच्याकडे त्या अर्जाची पावती आहे अशांसाठीचे हे सर्व्हेक्षण होणार आहे. तरी नवीन विक्रेते व ज्यांचे सर्व्हेक्षण झाले नाही त्यांनी यासाठी अर्ज करून नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर सर्व्हेक्षणासाठी खालील कागदपत्रे लागतील:-
1. जुने सर्व्हेक्षण पावती
2. आधार कार्ड
3. एक फोटो व इतर झेरॉक्स.
सदर सर्व्हेक्षणामध्ये नागरिकांना अधिका-यांचे सहकार्य नाही – काशिनाथ नखाते
यासंदर्भात कामगार नेते पिंपरी-चिंचवड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जे पात्र अर्जदार या आठही प्रभागांमध्ये जात आहेत संबंधित अधिका-यांचे त्यांना अजिबात सहकार्य मिळत नसून त्यांना यापासून वंचित ठेवले जात आहे. तसेच या प्रकरणी कोणतीही माहिती अथवा मदत हवी असल्यास त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर 8070804070 येथे संपर्क साधावा.