कोरेगाव :-श्री गाडगे महाराज आश्रम शाळा ब्रह्मपुरी येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी.
प्रतिनिधी:- प्रमोद देवाडीगा सातारा:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा ब्रह्मपुरी येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी.
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी जि. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी मा. प्रा.श्री महेश जाधव, वाग्देव कनिष्ठ महाविद्यालय वाठार स्टेशन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन आदरणीय मधुसूदन मोहिते पाटील होते.प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मवीर आण्णा व संत गाडगेबाबा याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आश्रमशाळेतील कलामंचाने संदेशगीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ भारती मोहिते यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक मा.प्रा.श्री. महेश जाधव यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी माहिती सांगताना स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या ब्रीदवाक्यानुसार चालत असलेली रयत शिक्षण संस्था कर्मवीर अण्णांच्या त्यागातून कशी निर्माण झाली याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मधुसूदन मोहिते पाटील यांनी कर्मवीर अण्णा यांनी बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणाचे व्रत हाती घेतले, त्यासाठी अथक परिश्रम केले व त्यातून रयत ची निर्मिती झाली. या कार्यात अण्णांची पत्नी लक्ष्मीबाई यांचाही मोलाचा वाटा होता असे सांगून आण्णा आणि संत गाडगेबाबा यांच्यातील जिव्हाळ्याचा संबंधाविषयी माहिती उपस्थितांना सांगितली.
शेवटी कार्यक्रमाचे आभार उपशिक्षक श्री. रमेश घोलप यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेशकुमार बोभाटे यांनी केले.