बामणोली:-22 गाव प्रिमिअर लीग कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे :-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे :-9146802009.
22 गाव प्रिमिअर लीग कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप.
22 गाव प्रिमिअर लीग यांचे कडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम.
15 ऑगस्ट अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत 22 गाव प्रिमिअर लीग कडून 22 गावांतील सर्व शाळा, हायस्कूल, आश्रमशाळा येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.त्यावेळी 22 गाव प्रीमियम लीग चे पदाधिकारी उपस्तीत होते. तसेच 22 गाव प्रिमिअर लीग स्थापन झाल्यापासून म्हणजेच 5 वर्षांपासून सातत्याने आपल्या भागासाठी क्रिकेटच्या माध्यमातून काही ना काही मदत करत आहे. तसेच भागातील जे ग्रामस्थ अडचणीत असतात अशाच्या पाठीशी उभे राहण्याचे काम व मदतीचे काम करत आहेत. स्वखर्चातून सामाजिक काम करणारी एकमेव लीग आहे. क्रिकेटच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम 22 गाव प्रीमियम लीग करत आहे. त्याचे या कामाचे बामणोली विभागातील गावांमध्ये कौतुक केले जात आहे.