आष्टी :-सांगवी- पाटण येथे दुर्मिळ कासवाला प्राणी मित्राने दिले जीवदान..
प्रतिनिधी:- सिराज शेख आष्टी:-9405829012

सांगवी- पाटण येथे दुर्मिळ कासवाला प्राणी मित्राने दिले जीवदान..
……………………………
आष्टी/प्रतिनिधी…..(शेख सिराज)
आष्टी तालुक्यातील सांगवी -पाटण येथील समिर शेख हे नेहमी प्रमाणे सुरेश आण्णा धस यांचे स्वीय सहाय्यक समीर शेख आष्टी वरून सांगवी पाटण येथे येत असताना .भैरवी हॉटेल जवळ नगर बीड हायवे वर एक दुर्मिळ कासव रस्त्यावर चालत असताना दिसले समीर शेख यांची मोटासायकल त्याच्यावरून जाणार की त्यांनी ब्रेक दाबला.. अर्जून झिंजूर्क,भरत जगताप यांना आवाज दिला व कासवाला सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि तात्काळ समीर शेख यांनी आष्टी येथील वन विभागाचे RFO शाम शिरसाठ याच्याशी संपर्क साधला आणि त्या कासवाला विहिरीत सोडले व जीवदान दिले..समीर शेख यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे,सामाजिक कार्यात ते नेहमीच पुढे असतात. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये त्यांनी आपल्या घरा समोर पक्ष्यांसाठी मूठभर चारा आणि घोटभर पाणी पक्षासाठी उपक्रम राबविला ,तसेच काही दिवसापूर्वी पूर्वी त्यांना एक पैशाचे पाकीट सापडले होते त्यांनी ते पण परत केले होते, ते नेहमीच सर्व-धर्म समभावचा संदेश देत असतात,आज सांगवी पाटण येथे कासवाला जीवदान देताना.., समीर शेख,अर्जुन झिंजूर्के,महादेव जगताप, भरत जगताप, आंबादास कांबळे, अनील मुरकुटे,संतोष मुरकुटे यांनी कासवाला विहिरीत सोडायला मदत केली..त्यामुळे समीर शेख यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.