निगडी:-ज्ञानदीप विद्यामंदिर रूपीनगर येथे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण उत्साहात.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रतिनिधी:- शफिक शेख निगडी :-9767275783.
ज्ञानदीप विद्यामंदिर रूपीनगर येथे
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण उत्साहात.
पुणे, निगडी, दि. 16 (शफिक शेख):- ज्ञानदीप विद्यामंदिर या प्राथमिक प्रशालेच्या प्रांगणात ७६व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. जनार्दन वाढोकार ( उद्योजक) व श्री. हरिश्चंद्र गोरे (निवृत पी. पी.ओ, नेव्ही) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेतर्फे करण्यात आले होते. मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांची आणि पालकांची उपस्थिती होती. यावेळी इयत्ता पहिली ‘क’मध्ये शिकणारा विद्यार्थी विघ्नेश अमराळे याने भारताच्या स्वातंत्र्याविषयी आणि कार्यक्रमाविषयी आपल्या छोटयाशा शैलीमध्ये उत्कृष्ट पद्धतीने व्यक्त केलेले मनोगत विलक्षण ठरले. या प्रसंगी ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस होते त्यांना मान्यवरांच्या हस्ते शुभाशीर्वाद देण्यात आले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. भागवत चौधरी, सचिव श्री. शांताराम भालेकर, सहसचिव श्री. सूर्यकांत भसे, खजिनदार श्री. दशरथ जगताप, श्री. सुभाष चौधरी ,श्री. संपत भालेकर श्री. नथूराम राक्षे, माजी अध्यक्ष श्री. धनाजी भालेकर ,श्री. मंगेश नेरकर, निवृत्त मुख्याध्यापक श्री. शिवशरण सालोटगी ,श्री. कुरळे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रुपा सोनवणे यांनी केले. श्री. देवरे , श्री. वाळकोळी ,श्री. म्हस्के,श्री. पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर फलक सजावट श्री. कदम सर आणि श्री. राठोड सर यांनी केले. सौ. सांगले यांनी आभार मानले.