मायणी:-ग्रामपंचायत मायणी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न.
प्रतिनिधी दिलीप पुस्तके सातारा :-9890318605

मुख्य संपादक:-प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रतिनिधी:- दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख:-9890318605.
ग्रामपंचायत मायणी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न.
मायणी प्रतिनिधी___खटाव तालुक्यातील दळणवळणाचे प्रमुख केंद्र असलेल्या मायणी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न झाला 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्याचा उत्साह शिगेला पोहोचला होता सकाळी साडेसात वाजता भगतसिंग प्राथमिक विद्यामंदिर व अनंत इंग्लिश स्कूल येथे माजी उपसरपंच आनंदा शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडली पडले त्यानंतर तलाठी कार्यालय येथे मुलांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सचिन गुदगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर मुख्य ध्वजारोहण गांधी मैदान येथे सरपंच युवानेते सचिन गुदगे यांच्या हस्ते झाल्यानंतर मायणी मुलांची शाळा मुलींची शाळा तसेच भगतसिंग प्राथमिक व अनंत इंग्लिश स्कूल यांच्या विद्यमाने समूहगीत देश देशभक्तीपर गीते व बाल
चमू केलेल्याभाषणाने उपस्थितांची मने
जिंकली गेली यानंतर कोरोना काळात वैद्यकीय सेवा करून अनेकांचे जीव वाचवल्याबद्दल डॉक्टर शशिकांत कुंभार डॉक्टर सयाजी पवार डॉक्टर अमोल देशमुख डॉक्टर तुरक माने डॉक्टर ताटे तसेच सर्व वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला त्या त्याचप्रमाणे रात्रंदिवस मेडिकल दुकाने उघडी ठेवून रुग्णाला सेवा देणाऱ्या मायणी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष महेश पुस्तके व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कोरोना काळात घरोघरी जाऊन औषधोपचार करणाऱ्या अशा सेविका अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात तसेच आजी-माजी जवानांचा ही सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी मोफत जागा देणाऱ्या दानशूर व्यक्ती राजू ठोंबरे व ज्ञानदेव दिवटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सचिन गुदगे म्हणाले की स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून रक्तातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे हे स्वातंत्र्य आपण व्यर्थ जाऊ द्यायचे नाही स्वातंत्र्यसैनिकांची स्मृती चिरंतर आपल्या हृदयात तेवत च ठेवायच्या.. . आहे मायणीविकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही डॉक्टर दिलीपराव येळगावकर माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली टेंभू योजनेचे पाणी मायणीच्या शिवारात आणली तसेच पाणीही उत्तरेकडील भागात तारळीचे पाणीपोचवले याशिवायसी मायणीशिंदेवाडी लक्ष्मी नगर येथे मुख्यमंत्री सडक ग्रामसडक योजनेतून रस्ते पूर्ण केले. आणि आमच्या काळात नळ पाणीपुरवठा सक्षमपणे राबवली. या कार्यक्रमास ग्रामपंचायत उपसरपंच जगन्नाथ भिसे सर्व सदस्य सर्व वैद्यकीय व्यावसायिक मेडिकल दुकानदार स्वातंत्र्यसैनिक वारसदार गणीभाई मुल्ला मज्जिद नदाफ राजकुमार चव्हाण दत्ता काबुगडे नितीन पडळकर डॉक्टर सयाजी -पवार अंगणवाडी सेविका शिक्षक पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी राजू कचरे यांनीआभार मानले.