निफाड (तालुका ):-वाहेगाव दहेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सैनिकास ध्वजारोहणाचा मान.
प्रतिनिधी रोहिदास वाघ निफाड :-9623631738

निफाड (तालुका ):-वाहेगाव दहेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सैनिकास ध्वजारोहणाचा मान. = दहेगाव (ता निफाड) ग्रामपंचायत वाहेगाव (दहेगाव) यांच्यावतीने स्वातंत्र्याचा ७५ अमृतमहोत्सव निमित्त ९ ऑगस्ट पासून विविध उपक्रम राबविण्यात आले. आज १५ ऑगस्ट रोजी सकाळी गावामध्ये ध्वजारोह अतिशय उत्साहात पार पडले नंतर ग्रामस्थ मंडळ व ग्रामपंचायत यांच्या वतीने गावातील माजी सैनिक धोंडीराम जगन्नाथ माळी यांच्या हस्ते वाहेगाव दहेगाव ग्रामपंचायतचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. तसेच माननीय ग्रामसेवक श्री अनिल कदम यांनी सैनिकांबद्दल गावाला गौरव व अभिमान आहे असे प्रतिपादन केले. तसेच वाहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजाचे पूजन ज्येष्ठ नागरिक श्री शिवाजी सखाहरी तिपायले व ध्वजारोहण पुंडलिक रूझा वाघ यांनी केले.तसेच शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप मा सरपंच सौ अलका ताई रमेश भंडागे तसेच मा उपसरपंच श्री चेतन भगीरत आहेर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अनिल विश्वास आहेर व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरुण शिवाजी निकम सर व रातकिडे सर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार सौ देशमुख मॅडम यांनी केले.
तसेच सन २०२१/२२ अंतर्गत१५ वित्त आयोगातून अंगणवाडीतील कुपोषित मुलांना आहार वाटप तसेच ग्रामनिधी ५% अपंग लाभार्थी यांना घरघंटी तसेच सन २०२२/२३ वर्षाकरीता ग्रामनिधी अंतर्गत१०% खर्चातून विद्यार्थ्यांना वही पेन पाटी व अंगणवाडीस व्हाईट बोर्ड वाटप ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले.