कोरेगाव :-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी ता.कोरेगाव जि.सातारा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
प्रतिनिधी प्रमोद देवाडीगा सातारा:- 9623714741

संपादक:- प्रल्हाद चव्हाण :-8208717483
कोरेगाव:-
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी ता.कोरेगाव जि.सातारा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. डॉ. धनंजय देवी सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संस्थेचे चेअरमन आदरणीय मधुसूदनदादा मोहिते पाटील होते.*
*यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह गीतगायन केले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शैक्षणिक वर्ष 2021.22 मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. एस.एस.सी परीक्षा 2021.22 मध्ये सातारा जिल्हा आश्रमशाळांमध्ये तसेच श्री गाडगे महाराज मिशनच्या V.J.N.T आश्रमशाळांमध्ये राज्यात सर्वप्रथम आलेल्या कुमारी अश्विनी मतकर या विद्यार्थिनीस एकूण रुपये 50000/- (पन्नास हजार रुपये) बक्षीस आणि पुढील शिक्षणासाठी मदत मिळवण्यात आली. सदरची मदत मिळवण्यासाठी संस्थेचे चेअरमन आदरणीय दादा व हितचिंतक मा.श्री. बाबुराव शिंदे साहेब यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास मा.प्रा. जयवंतराव जगताप, मा.प्रा आबासाहेब पालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. एम.एस.ई.बी ऑफिस अंगापुर यांनी विद्यार्थ्यांना केळी वाटप केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम यांनी केले. यावेळी मा.श्री. दत्तात्रय जाधव, मा.श्री. रघुनाथ शेरकर, मा.श्री.उत्तम कोरे, मा.श्री. कृष्णात बर्गे, दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.आभार श्री.रमेश घोलप यांनी मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. महेशकुमार बोभाटे यांनी केले.*