ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
उरमोडी नदीतून वाहून गेलेल्या युवकाला शोधण्यासाठी NDRF पथकाची शोध मोहिम.
प्रतिनिधी:- महेश मोहिते सातारा:-9167564361

उरमोडी नदीतून वाहून गेलेल्या युवकाला शोधण्यासाठी NDRF पथकाची शोध मोहिम. सातारा तालुक्यातील नागठाणे येथील उरमोडी नदीतून एक युवक वाहुन गेला मनोज सुधाकर गडकरी (वय २८ रा.नागठाणे ता.जि.सातारा ) असे युवकांचे नाव आहे रविवारी सायंकाळच्या सुमारास नागठाणे येथील तीन युवक नदीपात्रात पोहण्यासाठी गेले असता त्यातील दोघांनी पात्रात उडी घेतली परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यातील एक जण वाहुन गेला सुदैवाने एक युवक बचावला या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी भेट देऊन पंचनामा करून शोध सुरू केला परंतु तपास न लागल्याने NDRFची टीम दाखल झाली असून शोध मोहिम सुरू आहे.