ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
केरळचे महामहीम राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांनी शिर्डीत येऊन घेतले श्री साईबाबांचे दर्शन!
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

लोहगाव:-( प्रतिनिधी)
केरळ राज्याचे महामहीम राज्यपाल अरिफ मोहम्मद खान अहमदनगर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी श्री साई समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले.
केरळचे महामहीम राज्यपाल खान हे दिल्ली येथून विमानाने शिर्डीकडे आले. शिर्डी विमानतळ येथून ते शिर्डी शासकीय विश्रामग्रहात आले.नंतर फ्रेश होऊन त्यांनी शिर्डी येथील श्री साई समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले .यावेळी साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव विश्वस्त अविनाश दंडवते व सुनील शेळके उपस्थित होते. यावेळी साई संस्थांनच्या वतीने राज्यपाल महोदय यांचा सत्कार करण्यात आला.