आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा – आईचे प्रेम हे जगात सर्वश्रेष्ठ आहे- मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांचे प्रतिपादन.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे लोणंद

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे लोणंद

सातारा – आईचे प्रेम हे जगात सर्वश्रेष्ठ आहे- मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांचे प्रतिपादन.

श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी येथील मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या मातोश्री गंगाबाई संगाप्पा गुंडगुळे यांचे मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी वार्धकयाने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल श्री शनिश्वर देवस्थान आणि श्री शनेश्वर सेवेकरी मंडळ सोळशी,भाविकांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते
समाजकार्य आणि धर्मकार्य यांच्यासाठी सदैव झटणारे श्री नंदगिरी महाराज यांच्या रूपाने सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान असा मुलगा शिवक्य गंगाबाई संगप्पा गुंडगोळे यांनी घडविला
आईची ममता वासल्य प्रेम याची तुलना जगामध्ये कशाशीही होऊ शकत नाही ,आई ही जगात सर्वश्रेष्ठ आहे असे मनोगत मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी व्यक्त केले. या शोकसभेच्या सुरुवातीस आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते जगन्नाथ शिंदे यांनी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे शब्द उच्चारत सर्वांच्या मातोश्रीरूप असलेल्या गंगाबाई यांनी आपल्या निर्मळ प्रेमाने मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांना घडविले .तसेच या ठिकाणी येणाऱ्या अनेक भाविकांनाही त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिले .

या शोक सभेच्या वेळी सोळशी पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी आपली आदरांजली शब्दसुमनाने अर्पित केली .मोहनराव भोसले ,गजानन भोसले ,ओम शांती ब्रह्माकुमारीचे शितल बहन, कैलास धुमाळ तसेच उद्योजक राजकुमार लोढा, उद्योजक अरविंद मेहता दत्तात्रेय धुमाळ, विजयराव चव्हाण, सतीश धुमाळ अमित पाटील, रवींद्र भोसले आणि दयानंद सोळसकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. विशेष म्हणजे श्री शनेश्वर सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष हनुमंतराव वाघ यांनी आई म्हणजे साक्षात परमेश्वराने आपले प्रतिरूपच प्रत्येक मानवाच्या जवळ दिलेले असते .आई आपल्या मुलाला घडवते आणि देशाचा आणि समाजाचा उद्धार करण्याचा प्रेरणा देत असते अशाच आमच्या सर्वांच्या मातोश्री गंगाबाई संगाप्पा गुंडगोळे यांच्या निधनामुळे आम्हा सर्वांना दुःख झालेले आहे, सर्वांच्या वतीने शिवकय गंगाबाई गुंडगोळे यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी परमेश्वर चरणी अर्पणा अर्चना करून या शोक सभेची सांगता करण्यात आली. या शोक सभेच्या सरते शेवटी उद्योजक आणि देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी राजकुमार लोढा यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button