खंडाळा . रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन.
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण :-7972521412

प्रतिनिधी शुभम भापकर
खंडाळा . रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन.
रिपब्लिकन पार्टि आफ ईंडिया (A)खंडाळा तालुक्याच्या वतीने तहसिलदार खंडाळा यांना निवेदन
देण्यात आले व अंदोलनाचा ईशाराही देण्यात आला कारण रस्ता म्हटल की दळण-वळणाचे साधन समजतो परंतु खंडाळा तालुक्यातील पुर्व विभागातील दोन रस्ते सोडले तर विभागातील अंतरगत एक पण रस्ता चांगल्या दर्जाचा नाही सगळ्या रस्त्याची वाट लागलेली आहे.पाऊसामुळे भयंकर दुरावस्था झालेली आहे. वाड्या,वस्त्यावर,जाणार्या सगळ्याच रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आशातच खेड बुद्रुक गाव ते व्हटकर मळ्यात जाणार्या रस्त्याची तर किती भयंकर दुरावस्था झालेली आहे की या मुळे व्हटकर मळ्यातील लोकांचे ,जनावरांचे, जीवन जगणे मुश्किल झाले आहे .शाळेतील मुलांना रस्त्याने सर्वत्र चिखल असल्याने चालता येत नाही कितीतरी मुल ,मुली चिखलात पाय घसरुन पडलेत व अजुनही पडतात.कित्येक मुल शाळेतच जात नाहीत.शेतकर्यांना,कष्टकर्यांना,आजारी वयोव्रुध्द,जेष्ट नागरीकांना,महिलांना,जनावरांना सुध्दा या रस्त्याचा फटका बसला आहे कारण या व्हटकर मळ्यात दुभती जनावरे ,गाय,मैस,बैल,शेळ्या मेंढ्या,कोंबड्या आहेत परंतु एखाद जनावर आजारीच पडलं तर जनावरांचा डाक्टर रस्ता निट नसल्याने येत नाही त्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता आहे .अशीच अवस्था लोकांची पण आहे चुकुन कोणी आजारी पडल तर त्याला नेण्यासाठी या रस्त्याने बैलगाडी शिवाय कुठलेही मोटरवाहन जात-येत नाही .व्हटकर मळ्यातील लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तु घेण्याचं म्हटल तर खेडबुद्रुक गावातच जावे लागते.पण रस्ताच निट नसल्याने प्रत्येक गोष्टींन पासुन या व्हटकर मळ्यातील लोकांना वंचित रहावे लागत आहे .आपला भारत देश स्वतंत्र होऊन ७५. वर्ष झाली पण तेथील २५० लोकांना.आजुन आपण पारतंत्र्यात असल्यासारखे वाटत आहे .तरी तहसिलदार साहेब आपणांस विनंती आहे या व्हटकर मळ्यातील २५० लोकांचा गांभिरयाने विचार करावा व रस्त्याचे काम व उपाययोजना त्वरीत कराव्यात अन्यथा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा अध्यक्ष मा.दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेत्त्रुत्वाखाली येणार्या या तारखेस आपल्या कार्यालयासमोर तिव्र ,लक्ष वेधी,अंदोलन केले जाईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेन.