कुरवलीपाठी ते आंदरूड रस्त्याच्या दोन्ही बाजूंने काटेरी कुंपण वाढले.
प्रतिनिधी समीर खान पठाण फलटण:-9766685375

कुरवलीपाठी ते आंदरूड रस्त्याच्या दोन्ही बाजूंने काटेरी कुंपण वाढले.
फलटण प्रतिनिधी / समीर पठाण
कुरवलीपाठी ते शिंगणापूर हा रहदारी चा रस्ता झाला असून, या मार्गाने नोकर वर्ग , विद्यार्थी, देवाला जाणारे भाविक भक्त येजा करत असतात . तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी कुंपण वाढले असल्याने नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व कारणांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. PWD यांनी त्वरित या कडे लक्ष्य देऊन , रस्त्याच्या दोन्ही बाजूची काटेरी कुंपण काढण्याचे काम करावे .व लवकरात लवकर रस्ता मोकळा करावा अशी विनंती तरूण वर्ग , ग्रामस्थ करत आहे.
नागरिक – निलेश बनकर (सामाजिक कार्यकर्ते )
रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी कुंपण लवकरात लवकर काढून टाका, या हलगर्जीपणामुळे कोणाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.