ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बँक फोडण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीस दहा तासांच्या आत औंध पोलिसांनी लावला तपास, आरोपींना ठोकल्या बेड्या.

प्रतिनिधी नितीन कुलकर्णी :-9921778417

वडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा,

ग्रामस्थांच्या सतर्कतेने चोरट्यांचा डाव फसला,

औंध पोलिसांच्या कडून दहा तासात दरोडेखोर जेरबंद.

जिल्हा बँकेला सुरक्षारक्षक ठेवण्यात यावे ग्रामस्थांची मागणी*

हेडिंग-
बँक फोडण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीस दहा तासांच्या आत औंध पोलिसांनी लावला तपास, आरोपींना ठोकल्या बेड्या.

पुसेसावळी-

खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत शनिवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला,परंतु ग्रामस्थांच्या जागृती मुळ दरोडेखोरांचा डाव फसला, मागणील बाजुस असलेल्या खीडकीचे लोखंडी गज गॅस कटरच्या साहाय्याने तोडून बॅंकेत प्रवेश केला, तिजोरी गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना,सायरनचा आवाज सुरु झाला, आणि त्याचा आवाज आयकुन ग्रामस्थ बॅंकेच्या दिशेने येत असल्याचे जानवले, लगेच दरोडेखोरांनी तिथून पळ काढला,दरोडा पडला असल्याची माहिती औंध पोलिसांना समजताच पोलिस घटनास्थळी धाव घेतली, औंध पोलिस ठाण्याचे दराडे साहेब यांनी लगेच आपला तपास सुरू करत सगळीकडे नाकाबंदी करण्यात आली,दहा तासांच्या आत तीन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले, आरोपी हर्षवर्धन हरीचंद्र घार्गे वय 20 रा. शाहुनगर ता. जि.सातारा,यश संजय घार्गे वय 19 रा.दौलतनगर ता.जि.सातारा,
ऋषिकेश सोमनाथ घार्गे वय 20 रा. वडगाव जय राम स्वामी ता.खटाव जि.सातारा,अशी जेरबंद केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत,सदर कार्यवाही अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोर्हाडे अप्पर पोलीस अधीक्षक सातारा,सुचनेप्रमाने, निलेश देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी,यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी दराडे पोलीस उपनिरीक्षक औंध, गंगाप्रसाद केंद्रे,सपोफौ जाधव, राहुल सरतापे, राहुल जाधव, किरण हिरवे, महेश जाधव,यांनी सदरची कारवाई केली आहे.त्यामुळे ग्रामस्थांन मधून औंध पोलिसांचे कौतुक होत आहे.

*नितीन कुलकर्णी पुसेसावळी*

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button