ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कात्रज :-वाहनाच्या वर्दळीमुळे भक्तगण नाराज कात्रज, दि. 8 : जांभुळवाडी.
प्रतिनिधी अब्दुल रहीम शेख कात्रज:-8087601074

वाहनाच्या वर्दळीमुळे भक्तगण नाराज.
कात्रज, दि. 8 (अब्दुलरहिम शेख ) : जांभुळवाडी तलावाच्या जवळील असलेल्या स्वामी नारायण मंदिराच्या रस्त्याला वाहनाच्या वर्दळीमुळे भक्तगणातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हायवे लगत असलेल्या जांभुळवाडी तलावाच्या जवळील स्वामी नारायण मंदिर हे भक्तगणाचे दैवत असून येथे परिसरामधील आणि दूर-दूर वरुन भक्तगण दर्शनासाठी येत असतात.
या ठिकाणी जवळच असलेल्या हाॅटेलमध्ये येणाऱ्या खवैय्याच्या चार चाकी गाड्यांची वर्दळ असते. काही खवैय्ये गाड्या रस्त्यालगतच पार्क करत असतात ज्यामुळे वाहनांची कोंडी निर्माण होते.
तरी सदरील रस्ता हा भक्तांना ये जा करण्यासाठी आणि वाहनांची वर्दळ टाळण्यासाठी येथील संबंधितांनी, पदाधिकारी वर्गाने सहकार्य करावे अशी विनंती नागरिकांकडून आणि भक्तगणांकडून केली जात आहे.