ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे :-निगडी -थरमॅक्स चौक बनला वाहनचालकांसाठी कर्दनकाळ.

प्रतिनिधी:- शफिक शेख निगडी पुणे :-9767275783

थरमॅक्स चौक बनला वाहनचालकांसाठी कर्दनकाळ
पुणे, निगडी दि. 6 (शफिक शेख):- स्मार्टसिटी म्हणविल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड मधील गजबजलेल्या थरमॅक्स चौक हा वाहनचालकांसाठी कर्दनकाळ बनला असून प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
या चौकामध्ये कस्तुरी मार्केट ते आकुर्डी आणि निगडी ते भोसरी असे चार रस्ते एकत्र येत आहेत परंतु या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून ते रस्ते स्मार्टसिटीची स्मार्टनेस संपवत आहेत. अनेक वाहने या खड्ड्यांमध्ये पडत असून नागरिकांना दुखापतही होत आहे. ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया, लहान मुले यांना वाहनांवरून जाताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
सदर रस्त्याच्या डागडुजीसाठी आणि नागरिकांना या त्रासापासून मुक्ती मिळावी ‘आप’च्या महिला उपाध्यक्षा मैमुना शेख यांनी सारथी हेल्पलाईनवर अनेकवेळा तक्रार केली (टोकन क्रमांक एमए 31208) असतानाही संबंधित विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आणखी एक नागरिक नियामत शेख यांनीही सारथी हेल्पलाईनवर (टोकन क्रमांक एमए 31216) तक्रार केली होती परंतु त्यासही संबंधित विभागाकडून काही प्रतिसाद मिळत नाही.
यावरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विभागांचा नाकर्तेपणा दिसून येत आहे. तरी यावर मा. आयुक्तांनी गंभीर विचार करून संबंधित विभागांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button