क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-पुलाजवळ रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह ; संतप्त ग्रामस्थांचे सुपा पोलीस ठाण्यात आंदोलन.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

    पारनेर:-पुलाजवळ रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह ; संतप्त ग्रामस्थांचे सुपा पोलीस ठाण्यात आंदोलन.

पिंपरी गवळी येथील २७ वर्षीय मयूर थोरात याच्या मृत्यूने खळबळ; खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी

पारनेर (राजकुमार इकडे)- सुपा औद्योगिक वसाहतीत रात्रपाळी करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) सकाळी रुई छत्रपती-पिंपरी गवळी रस्त्यावरील पुलाजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयूर थोरात (वय २७, रा. पिंपरी गवळी, ता. पारनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सुपा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी केली.

[ चौकट –
धारदार हत्याराने वार केल्याचा संशय .
मयूर थोरात हा सुपा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला होता. गुरुवारी रात्रीची पाळी संपवून तो दुचाकीवरून घरी परतत असताना त्याच्यावर हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सकाळी रुई छत्रपती-पिंपरी गवळी रस्त्यावरील पुलाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.
मयूरच्या पाठीवर, पोटावर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्याची माहिती समोर आली आहे. धारदार हत्याराने वार करून तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासातूनच या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येणार आहे. ]

[ चौकट –
सहा महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह ,
मयूर थोरात याचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. नव्या संसाराची सुरुवात केलेल्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयूरच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे पिंपरी गवळी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. ]

[ चौकट –
ग्रामस्थांचे सुपा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन .
मयूरच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सुपा पोलीस ठाण्यात ठिय्या देत आपल्या भावना व्यक्त केल्या. अज्ञात आरोपींविरोधात तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करावा, घटनेचा सखोल तपास करावा आणि दोषींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
या घटनेमागे वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य किंवा अन्य कोणते कारण आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मयूरच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान सुपा पोलिसांसमोर आहे. हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, घटनेच्या वेळी काय घडले आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ]

[ चौकट –
तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणातील आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ]

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button