आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-जनता शिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त विवेक सावंत यांचे व्याख्यान.

पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

  वाई:-जनता शिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त विवेक सावंत यांचे व्याख्यान.

वाई: दि. १० ऑक्टोबर २०२६
जनता शिक्षण संस्थेच्या हीरकमहोत्सवा निमित्त दर महिन्याच्या १२ तारखेला विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात येतात. यातील तिसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व एमकेसीलचे मुख्य सल्लागार विवेक सावंत सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता किसन वीर महाविद्यालय प्रांगणात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सदर समारंभास संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
विवेक सावंत हे ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’ चे मुख्य मार्गदर्शक आहेत. सामान्य जनतेला भेडसावणारी ‘डिजिटल दरी’ सांधण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने २००१ मध्ये एमकेसीलची स्थापना केली. श्री. सावंत यांनी या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले.
या कंपनीच्या माध्यमातून श्री. सावंत यांनी संगणक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी राज्यव्यापी मोहीम राबवली.
त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे, कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय केवळ स्थानिक सहभाग आणि ई-लर्निंग प्रणालींच्या आधारे हा अभ्यासक्रम राबवणे शक्य झाले. यामुळे हा कार्यक्रम महानगरांपासून ते दुर्गम आदिवासी वस्त्यांपर्यंत पोहोचू शकला.
हे यश पाहून, राजस्थान, ओडिशा, हरियाणा, बिहार आणि केरळ यांसारख्या अनेक राज्य सरकारांनी श्री. सावंत यांना अशाच प्रकारचे राज्यव्यापी संगणक साक्षरता आणि रोजगारक्षमता प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी आमंत्रित केले. त्यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावरही विस्तारले असून, इजिप्त आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्येही ते पोहोचले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केलेल्या ऑनलाइन अभ्यासक्रमांना १८० देशांमधील विद्यार्थ्यांची पसंती मिळाली आहे.
तरी वाई पंचक्रोशीतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून, व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button