वाई:- किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी कामगिरी.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:- किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी कामगिरी.

वाई : राजेंद्र महाविद्यालय, खंडाळा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत संघातील खेळाडूंनी सांघिक भावना, आत्मविश्वास, शिस्त आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
संघप्रमुख वैष्णवी भणगे तसेच संघातील सर्व खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायण चौधरी, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य श्रावण पवार, पर्यवेक्षक डॉ. विलास खंडाईत, क्रीडा प्रमुख शिवराज तलवारे तसेच समिती सदस्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




