गुणवरे ता फलटण येथे अवैध ताडी विक्रीवर फलटण ग्रामीण पोलिसांचा छापा.. सव्वा लाख रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.
प्रतिनिधी समीर खान पठाण फलटण :-9766685375

गुणवरे ता फलटण येथे अवैध ताडी विक्रीवर फलटण ग्रामीण पोलिसांचा छापा.. सव्वा लाख रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.
फलटण प्रतिनिधी / समीर पठाण
गुणवरे तालुका फलटण गावाच्या हद्दीत अवैद्य ताडी विक्री करणाऱ्यावर छापा टाकून फलटण ग्रामीण पोलिसांनी सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका संशयतास अटक केली आहे अशोक इरन्ना भंडारी वय ४७वर्षे रा गिरवी फलटण असे संशयिताचे नाव आहे ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार ,सहा . पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे , सहा पोलीस फौजदार सुर्यवंशी , पो.हवा साबळे , पो.हवा . बड़े,पो.काँ अवघडे , पो.कॉ नरबट असे सरकारी जीप मधून गुणवरे गावात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , मौजे गुणवरे ता . फलटण गावचे हद्दीत बंडा आण्णासाहेब जाधव यांचे बंद घराचे समोर हिरव्या नेटचे आडोशास अशोक इरन्ना भंडारी रा गिरवी ता फलटण हा ताडीची बेकायदेशीरपणे विक्री करीत आहे अशी त्यांना खात्रीशीर | बातमी मिळाल्याने सपोनि सोनवणे व वरील सहकारी यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता अशोक भंडारी हा काळ्या रंगाचे स्कुटी क्र.एम.एच .४२ , ए . जी . ३५११ ही स्टँडवर लावून त्याच्यावर बसून बाजूस प्लॅस्टीकचे पाच कॅन व गाडीवर १ कॅन घेऊन बसलेला दिसला त्याच्या ताब्यात मिळुन आले सहा प्लॅस्टीकचे कॅनची पाहणी केली असता त्यामध्ये ताडी असल्याचे दिसून आले . त्याचे ताब्यात मिळुन आले ताडीचे , साहीत्याचे , रोख रक्कम , मोबाईल हँडसेट , मोटरसायकल असे एकुण १,२४,८१५ / – रूपये किमंतीचा मुद्देमालासह आरोपी | मिळुन आलेने सपोनि सोनवणे यांनी दोन पंचाचे समक्ष पंचनामा करून सदर मुद्देमाल जप्त केला त्याच्याविरिधात व आय.पी.सी. कलम ३२८ , महाराष्ट्र दारु अधिनीयम कलम ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन आज रोजी सदर आरोपीतास मा न्यायालयात हजर केले असता मा . न्यायालयाने आरोपीची ३ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा . पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत .