मायणी:-श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मायणी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मायणी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.
मायणी प्रतिनिधी__छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या मायणी नगरीत भगवान रामलीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवार दिनांक 22 रोजी मातोश्री सरुताई मठामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती सचिव रवींद्र बाबर यांनी दिली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की आयोध्या येथे होणाऱ्या भगवान श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मायणी गावात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे या ऐतिहासिक सोहळा निमित्त घरोघरी गुढी उभारून दीप प्रज्वलन करण्यात येत आहे संपूर्ण गावात ठिकठिकाणी रांगोळी घालण्यात येत आहे सर्व मंदिराची पूर्णपणे स्वच्छता केली असून मंदिरावर नवीन भगवी पताका लावण्यात आले आहे दुपारी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत वाद्यवृंदाच्या गजरात शोभायात्रा निघणार आहे या शोभा यात्रेत गजी मंडळ, बॅन्जो, पारंपारिक वाद्य, सुहासिनी महिला सहभाग घेणार आहेत तरी ग्रामस्थांनी दुपारी चार वाजता चांदणी चौक येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती विजय वरूडे यांनी केली आहे.