ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बजरंग दलाचे रविवारी पवनानगर येथे बेमुदत उपोषण.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकूर मावळ :-9960044802

बजरंग दलाचे रविवारी पवनानगर येथे बेमुदत उपोषण.
कोथुर्णे येथे चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीच व्हावी यासाठी बजरंग दल रविवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.
घडलेली घटना काळजाला पिळवटून टाकणारी आहे. फक्त कोथुर्णे किंवा मावळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला हदरवून टाकणारी घटना घडल्याने समाजात अतिशय संतप्त प्रतिक्रिया समाजातील तळागाळातील लोकांकडून व्यक्त होत आहेत.
पवनानगर, कामशेत, वडगाव मावळ अशा मुख्य ठिकाणी कँडल मार्च काढण्यात येत आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांकडून देखील मोर्चे काढून सदर आरोपीला फाशीच व्हावी अशी मागणी होत असताना बजरंग दलाने बेमुदत उपोषण करणार असल्याचे सांगितले.