ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोथुर्णे :-रूपाली चाकणकर यांची पीडित कुटुंबियांना भेट.

प्रतिनिधी:- धर्मेंद्र ठाकूर मावळ :-9960044802

रूपाली चाकणकर यांची पीडित कुटुंबियांना भेट.

कोथुर्णे येथे 3 ऑगस्ट रोजी सात वर्षीय स्वरा चांदेकर या चिमुरडीवर अत्याचार करून तिला मारुन टाकल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्या नंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबियांना सांत्वन पर भेट दिली. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी चोवीस तासात शोधून काढले. ही घटना अतिशय निंदनीय तशीच घृणास्पद आहे. खटला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महिला आयोग प्रयत्न करणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
पीडित कुटुंबियांची भेट घेऊन घडलेल्या सर्व घटनेची माहिती घेतली या प्रकरणात खटला चालविण्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची निवड करण्याची मागणी ग्रामस्थांनी आणि पीडित कुटुंबीयांनी रुपाली चाकणकर यांच्याकडे केली असता महिला आयोगाच्या वतीने उज्वल निकम यांनीच खटला चालवावा अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, उप विभागीय पोलिस अधिकारी ढोले पाटील, कामशेत पोलिस निरीक्षक संजय जगताप, आदी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button