आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:-मुस्लिम बांधवांकडून भर उन्हात डॉ..बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी खलील मुलानी खटाव:-8600942800

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी खलील मुलानी खटाव
खटाव:-आज संपूर्ण देश संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत आहे.त्याच प्रमाणे ह.टिपू सुलतान यंग सर्कल मायणी, भीम राजा प्रतिष्ठान, लहुजी प्रतिष्ठान मायणी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम आज साताऱ्यातील मायणी येथे पार पडले. डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मायणी येथील मुस्लिम बांधवांनी भर उन्हात दुपारी 11 वाजता रॅलीत रमजानचे रोजे ठेवून सहभागी होऊन कार्यक्रम पार पाडले आणि मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली आणि समतेचा उदाहरण पुन्हा एकदा दाखवून दिले.