कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर आगाराचा कारभार रामभरोसे! जीर्ण वर्कशॉपमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ, एसटी प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर..

पत्रकार अनंत जाधव मुंबई शहर उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 महाबळेश्वर आगाराचा कारभार रामभरोसे! जीर्ण वर्कशॉपमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ, एसटी प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर..

अनंत शंकर जाधव
पत्रकार व मा.विशेष कार्यकारी अधिकारी

जागतिक पर्यटन नकाशावर ‘नंदनवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर या पर्यटनदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि सक्षम असलेल्या तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी आगाराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या या महत्त्वपूर्ण पर्यटन तालुक्याचे बस दुरुस्तीचे वर्कशॉप (कार्यशाळा) आज जीर्ण आणि बेवारस अवस्थेत उभे आहे. एसटी प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि लालफितीच्या कारभारामुळे वर्कशॉपची दुर्दशा झाली असून, या गलथान कारभारामुळे बस दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा थेट फटका देश-विदेशातून येणाऱ्या लाखो पर्यटक आणि स्थानिक सामान्यांच्या सुरक्षेला बसत आहे.

महाबळेश्वर एसटी आगारातील बस दुरुस्तीचे मुख्य कार्यशाळा (वर्कशॉप) अत्यंत जीर्ण आणि दयनीय अवस्थेत पोहोचले आहे. छताची पडझड, पावसाळ्यात होणारी गळती आणि अपुऱ्या सुविधांमुळे या वर्कशॉपमध्ये बस दुरुस्तीची कामे करणे जिकिरीचे बनले आहे. परिणामी, गाड्या वारंवार बिघडणे आणि वेळेवर दुरुस्त न होणे यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून, एसटी प्रशासनाचा हा अनास्था कारभार नागरिकांच्या माथी मारला जात आहे.

वर्कशॉपमध्ये गाड्यांची योग्य व वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने बिघडलेल्या, जुनाट बसेस रस्त्यावर उतरवल्या जात आहेत. घाटाच्या रस्त्यांवर गाड्यांचे ब्रेक फेल होणे किंवा तांत्रिक बिघाड होणे हे नित्याचे झाले असून, हा प्रकार थेट प्रवाशांच्या जिवाशी खेळणारा आहे. महाबळेश्वरच्या मुसळधार पावसात या जीर्ण वर्कशॉपच्या छतावरून पाण्याचे पाट वाहतात. यंत्रसामग्री भिजत पडते आणि कर्मचाऱ्यांना छत्री किंवा ताडपत्रीखाली जीव मुठीत धरून काम करावे लागते. वाढत्या फेऱ्यांच्या तुलनेत वर्कशॉपमध्ये आधुनिक उपकरणांचा व सुट्या भागांचा अभाव आहे. अनेकदा किरकोळ बिघाडासाठीही गाड्या तासनतास उभ्या ठेवाव्या लागतात. स्थानिक स्तरावरील अधिकारी आणि वरिष्ठ पातळीवरील दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपयांच्या महसूल देणाऱ्या या आगाराची खालावलेली अवस्था सुधारण्यास कुणीही तयार नाही.

महाबळेश्वर आणि पुणे, पोलादपूर, महाड, कोल्हापूर, सांगली तसेच सातारा मार्गावर दररोज हजारो पर्यटक येजा करतात. वर्कशॉपमध्ये गाड्यांची योग्य व तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित दुरुस्ती होत नसल्याने, अनेक जुनाट व बिघडलेल्या बसेस रस्त्यावर उतरवल्या जातात. नागमोडी आणि तीव्र उताराच्या घाटामध्ये बसेसचे ब्रेक फेल होणे किंवा तांत्रिक बिघाड होणे हे पर्यटकांच्या आणि प्रवाशांच्या मृत्यूस आमंत्रण देण्यासारखे आहे.

वीकेंडला येणाऱ्या पर्यटकांना तासन्‌तास बसस्टँडवर ताटकळत राहावे लागते. शालेय विद्यार्थी, नोकरदार, स्थानिक नागरिक आणि पर्यटक या कोलमडलेल्या व्यवस्थेमुळे अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. “एका आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाची व्यवस्था इतकी कोलमडली असताना एसटी प्रशासन नेमकी कोणती वाट पाहत आहे?”

जर एसटी प्रशासनाने तातडीने या जीर्ण वर्कशॉपच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला नाही आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत, तर महाबळेश्वरमधील नागरिक, विविध संघटना आणि प्रवासी तीव्र आंदोलन छेडतील यात तीळ मात्र शंका नाही.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button