पुणे:-गणेशोत्सवामध्ये विधीसंघर्षीत बालकाकडुन एक गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत – भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-गणेशोत्सवामध्ये विधीसंघर्षीत बालकाकडुन एक गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत – भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी.

दिनांक १८/०९/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक अण्णा दराडे, व पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर यांना त्यांचे गोपनीय वातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, दोन विधीसंघर्षीत बालक हे लेकटाऊन रोडवरील शंकरराव राजाराम कदम स्वीमींग पुलाचे समोरील बाजुस रोडलगत थांबले आहे. लागलीच पोलीस उप निरीक्षक अण्णा दराडे व नमुद अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता दोन विधीसंघर्षीत बालके हे त्याचे ताव्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टसहीत दिनांक दिनांक १८/०९/२०२६ रोजी १९.५३ वा मिळुन आल्याने त्याचेकडुन गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करुन, त्याचेविरुध्द सरकारतर्फे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४७५/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ, पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक अण्णा दराडे, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चोधरी, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार, संदीप आगळे, यांच्या पथकाने केली आहे.
(सुदर्शनं गायकवाड)
वरीष्ठ पोलीस निरीक्षक
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर




