आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंबेगाव:-(पुणे)-एक असाही विसर्जन सोहळा आंबेगाव पोलीस स्टेशन गणेशोत्सव 2026 वर्ष – 2 रे

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 आंबेगाव:-(पुणे)-एक असाही विसर्जन सोहळा
आंबेगाव पोलीस स्टेशन गणेशोत्सव 2026 वर्ष – 2 रे

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेगाव पोलीस स्टेशन येथे श्रीं ची स्थापना करण्यात आली होती. दिनांक 20/09/2026 रोजी सकाळी 11.00 वा. आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गणेश विसर्जन मिरवणूक चे आयोजन करण्यात आले होते. सदर मिरवणुक ही एक आदर्श प्रस्थापित करणारी व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांचा मानस होता. त्यामुळे या मिरवणुकीमध्ये वारकरी पथक व ढोल ताशा पथक यांना बोलावण्यात आले होते. सदर वारकरी पथके खास आळंदीवरून करण्यात आले होते.

मिरवणुकिची सुरुवाती ही टाळ मृदुंग वादन करून हरिनामाचा जयघोष करत अगदी भक्तीमय वातावरणात करण्यात आली. त्याचबरोबर ढोल ताशा या पारंपारिक वाद्याचे देखील सुरेख वादन सादर करण्यात आले. श्री गणेशासाठी खास पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीचे नियोजन करण्यात आले होते. आंबेगाव पोलीस स्टेशन ते शनी नगर चौक -टेल्को कॉलनी चौक- परत जांभूळवाडी रोड ते जांभुळवाडी तलाव यादरम्यान काढण्यात आली होती. लहान मुलांचे वारकरी पथक तसेच ढोल ताशा पथक यामुळे आंबेगाव पोलीस स्टेशनच्या मिरवणुकीकडे परिसरात एक आदर्श मिरवणूक म्हणून पाहिले जात आहे.


सदर मिरवणुकीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री चांगदेव सजगणे, सपोनी भोजलिंग दोडमिसे, फिरोज मुलानी, महेश नाईकवाडी,स्वाती देवधर, अश्विनी पाटील, प्रियांका गोरे, पोउपनि युवराज शिंदे, मारुती वाघमारे, नीतीराज थोरात, लक्ष्मण डोईफोडे, सुनीता काकुर्ले व पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार तसेच महिला दक्षता समिती सदस्य मोहल्ला कमिटी सदस्य, अल्पसंख्याक समिती, ज्येष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button