आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाईत मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार! महागणपती घाटापासून तहसील कार्यालयापर्यंत जनसागर; “आता माघार नाही, आरपारच्या लढाईला सुरुवात!”

पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाईत मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार! महागणपती घाटापासून तहसील कार्यालयापर्यंत जनसागर; “आता माघार नाही, आरपारच्या लढाईला सुरुवात!”

वाई | प्रतिनिधी :
आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सातारा जिल्हा बंदला वाई तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर वाई शहरातील महागणपती घाटापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत पायी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सरकारविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
“मनोज जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे”, “आता माघार नाही!” अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला वाई तालुक्यातील जनतेचा ठाम पाठिंबा असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या अकरा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असून, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांचा निकराचा लढा सुरू आहे. मात्र सरकारकडून या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणामुळे जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होत असल्याने सरकारने तातडीने हस्तक्षेप करून मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यातील व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला वाई तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. मोर्चादरम्यान सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
महागणपती घाटापासून सुरू झालेला हा पायी मोर्चा तहसीलदार कार्यालयावर पोहोचल्यानंतर मराठा समाजाच्या वतीने माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून मराठा समाजाच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि आंदोलनाची पुढील तीव्रता टाळण्यासाठी त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, “आरक्षणाचा प्रश्न आता केवळ आश्वासनांवर थांबणार नाही; सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा उपस्थित मराठा बांधवांनी दिला. त्यामुळे वाईतील या मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.
“आता माघार नाही… आरपारच्या लढाईला सुरुवात झाली आहे!” असा निर्धार व्यक्त करत वाई तालुका मराठा क्रांती मोर्चाने सरकारला आपल्या मागण्यांची तातडीने दखल घेण्याचे आव्हान दिले.
RPS STAR NEWS – पत्रकार रेखा येवले

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button