कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील अवैद्य धंद्याविरोधात पी.आर.पी.दि २ सप्टेंबर रोजी आंदोलनात.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सातारा जिल्ह्यातील अवैद्य धंद्याविरोधात पी.आर.पी.दि २ सप्टेंबर रोजी आंदोलनात.

सातारा दि: सातारा जिल्ह्यामध्ये सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे या प्रशासकीय कारभाराला लोक कंटाळलेले आहेत. एवढेच नव्हे तर अवैद्य धंदे व त्यातून वाढणारी गुन्हेगारी हा चिंतेचा विषय झाला आहे . यासाठीच सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होत आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे कार्याध्यक्ष विशाल भोसले व सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत आंदोलन होत आहे. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये गाव तिथे अवैद्य धंदा… व वस्तीत येथे मटका…. असे त्याचे स्वरूप झालेले आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे तरुण पिढी जादा पैसे कमवण्यासाठी अनाधिकृत मटका व ऑनलाइन रमी सारख्या आत्मघातकी सवयीला बळी पडलेली आहेत व व्यसनी बनू लागलेले आहेत. ही खूप मोठी चिंतेची बाब ठरलेली आहे महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा सातारा जिल्ह्यामधील पान टपरी ते किराणा दुकानात खुलेआम गुटखा विक्री केली जाते. विशेष बाब म्हणजे काही वडीलधारी मंडळी बाजूला उभे असताना सुद्धा काही दुकानदार लहान मुलांना सुद्धा गुटखा विक्री करीत असल्याचे नाईलाजाने उघड्या डोळ्याने पाहावे लागत आहे. कायदा व सुव्यवस्थेची धिंडवडे निघत असून या सर्वच गोष्टीला फक्त जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणाच जबाबदार नसून काही समाजकंटक खुलेआम हाच व्यवसाय करत आहेत. या सर्व गोष्टींचा जनमानसातून आक्रोश सुरू झालेला आहे. आज सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वतीने निवेदन देण्यात आलेले आहे. अवैध धंद्याला पोलीस प्रशासन काहीजण प्रोत्साहन देते की काय? असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. काही ठिकाणी पोलीस प्रशासनातील हप्ते बाजूची चर्चा होताना दिसते. परंतु, इतर समाजमनावर त्याचा नैतिक दबाव राहावा. असे कोणीही काम करत नाहीत. ही खेदाची बाब आहे. या सर्व गोष्टी सर्वसामान्य जनता गुलामगिरी सारखी सहन करत आहे. ही लोकशाही नसून हप्ते शाही सुरू आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने सातारा जिल्ह्यातील अवैद्य धंदे व मटका गुटका विक्री बाबत कडक कारवाई करण्यासाठी हे बेमुदत ठिय्या आंदोलन केलेले आहे. हे आंदोलन कोणत्याही जाती-धर्माच्या अथवा भावना भडकवणारे नसल्यामुळे समाजातील विविध घटकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन हे जन आंदोलन उभे करावे. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये तालुका पातळीवरून ते जिल्हा पातळीपर्यंत अनेक कमिशन एजंट व गुटखा दारू विक्रेते आणि भ्रष्ट अधिकारी यांचे आर्थिक लागेबांधे सुदृढ वैचारिक समाजासाठी घातक ठरत आहेत. हे अनंत काळापासून सुरू असले तरी समाजमन काही परिवर्तन घडवू शकते. सातारा जिल्ह्यातही असे परिवर्तन होऊ शकते. यावर ठाम विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलना सहभागी व्हावे .अशी नम्र विनंती ही करण्यात आलेली आहे……………………….. फोटो -सातारा जिल्ह्यातील अवैद्य धंदे बंद व दुसरीवर कारवाई करण्यासाठी निवेदन देताना श्री रमेश उबाळे

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button