पुणे पिंपरी:-गुन्हे शाखा युनिट 1 ची पुन्हा कमाल 14 वर्षांपूर्वीच्या खूनाचा छडा लावत प्रकाश चव्हाण गॅंगच्या आरोपीस अटक.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
गुन्हे शाखा युनिट 1 ची पुन्हा कमाल
14 वर्षांपूर्वीच्या खूनाचा छडा लावत
प्रकाश चव्हाण गॅंगच्या आरोपीस अटक.
पिंपरी, दि. 24 (शफिक शेख):- आपल्या वैवाहिक जीवनात बाधा ठरत असणा-या आपल्या अनैतिक प्रेयसीचा 14 वर्षांपूर्वी खून करून फरारी असलेल्या प्रकाश चव्हाण गॅंगचा मेंबर आप्पा गोमाजी मोहिते यांस गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने मोठया शिताफीने अटक करीत पुन्हा एकदा आपली कार्यतत्परता सिद्ध केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 21/4/2008 रोजी बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी येथे आरोपी आप्पा गोमाजी मोहिते या प्रकाश चव्हाण गॅंगच्या मेंबरने त्याची अनैतिक प्रेयसीला केएसबी चौकातून अपहरण करून घरात कोंडून ठेवले आणि तिचा निर्घृणपणे खून करून फरारी झाला. तेव्हा पासून तो गायब होता.
सुमारे 15 वर्षानंतर सदर आरोपी हा मु. पो. वाकी, राजगुरूनगर येथे लपून रहात असून चाकण एमआयडीसी येथे मजुरीने काम करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 1 ला मिळाली. परंतु पोलिसांकडे त्याचा 15 वर्षांपूर्वीचा फोटो होता आणि आताचा फोटो उपलब्ध नसल्याने त्यास ओळखणे कठिण होते. तरी पोलिसांनी माहिती काढत वाकी येथे सापळा रचून त्यास घरी जात असताना ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केले असता आपली प्रेयसी आपल्याला पत्नीला घटस्फोट देवून तिच्याशी लग्न करण्याची अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने आपण तिचा खून केल्याचे मोहिते याने कबूल केले. पुढील तपास भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहीया, अपर पोलीस आयुक्त संजयकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहा. पो. आयुक्त डॉ. प्रकाश अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे व. पो. नि. ज्ञानेश्वर काटकर, पोलीस नाईक 1417 महाडीक, पो. ना. 1524 सचिन मोरे, पो. शि. 1791 गर्जे, 2959 महाले यांच्या पथकाने केली. यामध्ये तांत्रिक पो. ह. 754 कमले आणि पो. ह. प्रशांत माळी यांनी विशेष सहकार्य केले.