क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निमसोड:-घरात प्रवेश करून घरातील कपाटातील व देवघरातील 15,01,000/- रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करुन चोरट्यांनी केले लंपास.

प्रतिनिधी शरीफ पटेल सातारा:-9922912755

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

दिनांक 21/12/2022

निमसोड:-घरात प्रवेश करून घरातील कपाटातील व देवघरातील 15,01,000/- रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करुन चोरुन नेले आहे.

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत ): खबरी जबाब ता. 24/12/2022 मी संजय हिंदूराव घाडगे वय 47 वर्षे व्यवसाय रिफायनरी राहणार पश्चिम घाडगे मळा निमसोड ता. खटाव

सध्या राहणार 12/13 आलमगिरीगंज, शिवाजी मार्क, ब्रिज मार्केट बरेली राज्य उत्तर प्रदेश मोबाइल नंबर 9870727903 समक्ष वडूज पोलीस स्टेशन येथे हजर राहून देतो खबरी जबाब कि, मी वरील ठिकाणी राहणेस असून गावी माझी आई गंगूबाई हिंदूराव घाडगे या राहणेस आहेत. व मी व माझी पत्नी मुले असे रिफायनरी व्यवसायानिमित्त आलमगिरी गंज, शिवाजी मार्के, ब्रिज मार्केट बरेली राज्य उत्तर प्रदेश येथे राहणेस आहे. मी अधून मधून गावी सणासुदीला येत

जात असतो. दिनांक 21/12/2022 रोजी वा चे सुमारास माझे मामाचा मुलगा दिलीप दत्तात्रय जाधव राहणार पाचुंद ता कराड हा आजारपणाने मयत झाल्याने दिनांक 21/12/2022 रोजी सकाळी 11/30 वा चे सुमारास माझी आई गंगूबाई घाडगे हि आमचे निमसोड येथील घर बंद करुन घराला कुलुप लावून पांचुद येथे अत्यंविधीसाठी गेली होती. त्यानंतर काल दिनांक 23/12/2022 रोजी सकाळी 8/00 वा चे सुमारास मी बरेली राज्य उत्तरप्रदेश येथे असताना मला माझे चुलत चुलते अधिकराव हरिया घाडगे यांनी मला फोन करून सांगितले कि, आमचे निमसोड येथील घराचे दरवाजा उडा दिसत असून घराचे दरवाजाच्या कोईडा तुटलेला दिसत आहे. असे सांगितले म्हणून मी लागलीच माझे कुटुंबासह निमसोड येथे येण्यास निघालो. त्यानंतर माझी आई गंगूबाई हि पाद येथून गावी निमसोड येथे दुपारी 3/00 वाचे सुमारास आली त्यावेळी तिने घरात जावून पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले तसेच कपाटाचे दरवाजे तुटलेची दिसली म्हणून माझे आईने मला फोन करून सांगितले. मी आज पहाटे 3/00 वाचे सुमारास माझे गावी घरी येवून पाहिले असता आमचे राहते घराचे दरवाज्याचे कुलूप तुटलेले होते तसेच घरातील कपाटाची दरवाज्या सोडून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. आमचे कपाटातील व देवघरात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख मिळून आली नाही.आमची खात्री झाली कि कोणीतरी अज्ञात चोरट्याने दरवाज्याचे कातरी तोडून घरात प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी करून पळून गेले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button