पारनेर:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव येथे सीएसआर फंडातून सी एम एल कंपनी मार्फत पेवर ब्लॉक चे भूमिपूजन.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव येथे सीएसआर फंडातून सी एम एल कंपनी मार्फत पेवर ब्लॉक चे भूमिपूजन.

पारनेर (राजकुमार इकङे)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव येथे आज शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी एमआयडीसी म्हसने फाटा येथील नामांकित कंपनी *CML* मार्फत सीएसआर फंडातून पेवर ब्लॉक बसवण्याचे भूमिपूजन पार पडले. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तसेच इतर कार्यक्रमासाठी उपयोगी होईल अशा पद्धतीने फेवर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे यावेळी कंपनीचे
प्लॅट हेड श्री विठ्ठल मुक्कनवार,
एच आर हेड संजय टेनी,
प्रोजेक्ट सिनियर ऑफिसर अश्विनकुमार शेळके, कॉन्ट्रॅक्टर अमोल गाडेकर उपस्थित होते.
यावेळी सरपंच महेशकाका देशमुख ,प्राध्यापक चंद्रकांत शिंदे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ प्राजक्ता चहाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना श्रीम वंदना आसने. उपा.श्री पठारे संदीप , रुपाली गंधाडे . हे उपस्थित होते.
पठारे संदीप यांच्याकडून शाळेतील गरजांविषयी कंपनी कडे माहिती देण्यात आली. तसेच शिंदे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेतील विविध कामांविषयी माहिती देण्यात आली. तसेच कंपनीच्या एच आर हेड संजय टेनी यांनी शाळेविषयी आपले मत व्यक्त करत यापुढे ही शाळेच्या अडचणींकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले गेले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना असणे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.




