आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर तहसीलची लाजिरवाणी दशा! रेशनसाठी अंध वृद्ध महिला चिमुकल्यासह जमिनीवर…

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 पारनेर तहसीलची लाजिरवाणी दशा! रेशनसाठी अंध वृद्ध महिला चिमुकल्यासह जमिनीवर…

पारनेर-राजकुमार इकडे

पारनेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कारभाराचा भोंगळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रेशन धान्य मिळत नसल्याने एक अंध वृद्ध महिला आपल्या लहान बाळाला घेऊन थेट पुरवठा शाखेच्या दारातच जमिनीवर बसून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार आक्रमक होऊन पुरोठा अधिकारी यांना फोन द्वारे धारेवर धरत जाब विचारून घटनेची गंभीर दखल घेत पुरोठा विभागाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.

गरीब गरजू जनतेला न्याय देणाऱ्या तहसील कार्यालयातच जर अंध वृद्ध महिलेला अशा प्रकारे वाऱ्यावर सोडले जात असेल तर प्रशासन करते तरी काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला..?
फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, वृद्ध आजी भिंतीला टेकून हतबलपणे बसली असून तिच्या मांडीवर एक लहान बाळ झोपले आहे. बाजूला लाल पिशवी आणि शासकीय टेबल आहे. कार्यालयात कर्मचारी असूनही तिची कोणीही दखल घेतली नाही.

शासन गरीबांना मोफत रेशन देत असल्याचा गाजावाजा करत असताना प्रत्यक्षात तळागाळातील लाभार्थ्यांना धान्यासाठी अक्षरशः भीक मागावी लागत आहे. या अमानवीय प्रकाराला जबाबदार कोण? पुरवठा अधिकारी की मुजोर यंत्रणा?
या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गंभीर दखल घेऊन संबंधित महिलेला पुरोठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तात्काळ धान्य मिळवून दिले असल्याचे पवार यांनी सांगितले.
तसेच या बाबत मनसे तालुका अध्यक्ष अविनाश पवार म्हणाले की घटना अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे संबंधित मावशी बाबत पुरवठा विभागाला जाब विचारून महिलेला न्याय मिळवून दिला असला तरी याला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या त्या गावातील स्वस्त धान्य दुकानदार यांचा संपूर्ण सात बारा लवकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढेल.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक,सबस्क्राईब,कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button