आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-चिंचविहिरे जिल्हा परिषद शाळेत ८० वा स्वांतत्र्य दिन उत्साहात ! विद्यार्थी गुणगौरवासह शाळेच्या विकासासाठी दादृत्वाचा हात.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 श्रीरामपूर:-चिंचविहिरे जिल्हा परिषद शाळेत ८० वा स्वांतत्र्य दिन उत्साहात ! विद्यार्थी गुणगौरवासह शाळेच्या विकासासाठी दादृत्वाचा हात.

श्रीरामपुर / माळेवाडी ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) राहुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचविहिरे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला . शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मारुती नालकर यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी – विक्री संघटनेचे अध्यक्ष श्री अशोक जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिननिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे , संगीतमय कवायत आणि लेझीम नृत्याचे उत्स्कृर्त सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली तसेच मागिल वर्षी झालेल्या लक्षवेध स्कॉलरशिप परीक्षेत प्रविण्या मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन कार्यक्रमाला सरपंच , उप सरपंच , ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य सोसायटीचे चेअरमन व सदस्य ‘ पोलीस पाटील ग्रामसेवक , अंगणवाडी सेविका व मदतनीस गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
शाळेच्या विकासासाठी दातृत्वाचा हात
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेच्या रंगकामासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मारुती नालकर यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व शैक्षणिक साहित्याकरिता ९०० रुपये बक्षीस म्हणून दिले श्री सचिन साळवे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले . श्रीमती स्वाती थोरात यांच्या पती श्री गणेश कुहें सर यांनी शाळेला ११ चटया व एक व्हाईट बोर्ड भेट दिला याशिवाय श्री दीपक नरोडे ,या श्री राजेंद्र गिते , श्री भारत साळवे , श्री आप्पा नालकर , ग्रामपंचायत तसेच इतर विद्यार्थीप्रिय नागरिकांनी विद्यार्थ्यासाठी खाऊचे वाटप केले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा सोबतच शाळेच्या भौतिक सुविधांसाठी ग्रामस्थ व दात्यांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद ठरली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या वतीने सर्व उपस्थितांचे व देणगीदारांचे आभार मानण्यात आले

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button