ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोरे वस्ती येथील डांबरी रोडची झाली दुर्दशा- कॉन्ट्रॅक्टरच बोलतोय नागरिकांना डांबर कमीच टाकलेय.

प्रतिनिधी:- शुभम भापकर फलटण:-7972521412

मोरे वस्ती येथील डांबरी रोडची झाली दुर्दशा- कॉन्ट्रॅक्टरच बोलतोय नागरिकांना डांबर कमीच टाकलेय.

कॉन्ट्रॅक्टरचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे साठे लोटे तर नाही ना?

विशेष प्रतिनिधी.शुभम भापकर

सरडे – सरडे बंगला येथील मोरे वस्ती येथील डांबरी रोड अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला आहे या रोडवर डांबर हे अतिशय कमी प्रमाणात पडले असून या रोड वरील खडी पूर्णत्वा एक दोन पावसामध्ये निघून जायला सुरुवात झाली आहे डांबरच कमी पडले कॉन्ट्रॅक्टर स्वतः नागरिकांना बोलतोय. ज्यावेळेस रोडची पाहणी करण्यासाठी येतात त्यावेळेस अधिकारी कुठे गेले असा सवाल नागरिक करत आहेत, या रोडवर पाहणी करणारे अधिकारी रोड पाहत होते की हॉटेलमध्ये बसत होते अशा चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत. या रोडवर ची पाहणी कोणी अधिकाऱ्यांनी केली ? डांबर कमी हे दिसतच आहे. पण या पाठीमागे खडी मुरूमा चे कशाप्रकारे काम केले असेल. संबंधित काही नागरिकांनी कॉन्ट्रॅक्टरला फोन द्वारे विचारणा केली असता त्यावेळेस स्वतः कॉन्ट्रॅक्टरच नागरिकांना बोलतोय रोडवर डांबरच कमी पडले. रोड हा चुकीचा झाला आहे , रोड कामगारांनी हे काम चुकीचे केले आहे असे बोलण्यात येत आहे रोड करणाऱ्या कामगारांना काम दिले आहे की कॉन्ट्रॅक्टरला असा सवाल नागरिक करत आहे या रोडची पूर्ण चौकशी करुन संबंधित कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांन मधून होत आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button