आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आष्टी:-उंदरखेलमध्ये मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराची नांदी! ‘घराजवळ आरोग्यसेवा, मोफत तपासणी व उपचारांची सुवर्णसंधी’

पत्रकार अमजद शेख बीड जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आष्टी:-उंदरखेलमध्ये मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराची नांदी! ‘घराजवळ आरोग्यसेवा, मोफत तपासणी व उपचारांची सुवर्णसंधी’

उंदरखेल (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मा. आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या अनुषंगाने ग्रामस्थांच्या प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी सोमवार, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता उंदरखेल गावात प्रथम तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे तपासणी शिबिर मा. सभापती राजेंद्र दहातोंडे (आण्णा) यांच्या घराजवळील गाळ्यात पार पडणार असून, गावातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये विविध आजारांची प्राथमिक तपासणी तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून करण्यात येणार आहे. तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येईल. विशेष म्हणजे, पुढील उपचारदेखील शासनाच्या योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याने ग्रामीण नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्य तपासणी, योग्य निदान आणि मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार असल्याने या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button