पाचगणी:-“धोक्याची घंटा! मुसळधार पावसाचा तडाखा; तपनेश्वर मंदिराजवळील शेती खचली, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण”.
पत्रकार अमोल चोरगे महाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“धोक्याची घंटा! मुसळधार पावसाचा तडाखा; तपनेश्वर मंदिराजवळील शेती खचली, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण”.

महाबळेश्वर/पाचगणी प्रतिनिधी :
महाबळेश्वर-पाचगणी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी भूस्खलन व जमिनी खचण्याच्या घटना घडत आहेत. अशातच महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली गावातील तपनेश्वर मंदिराजवळील शेतीचा मोठा भाग अचानक खचल्याची घटना घडली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जमिनीची पकड कमकुवत झाल्याने शेतीचा काही भाग खोलवर खचला. या घटनेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून भविष्यात आणखी जमीन खचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी तसेच परिसराचे भू-तांत्रिक सर्वेक्षण करून भविष्यातील धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने घाटमाथ्यावर पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी नदी, ओढे, धोकादायक डोंगरकडे तसेच भूस्खलनप्रवण भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




