वाई पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाची दमदार कामगिरी.
संपादक :-प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रेस नोट ता.२९/०७/२०२२.
वाई पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून वाई व महाबळेश्वर शहरातील चोरीस गेलेल्या ५ हिरो
होंन्डा पल्सर व १ बलेट अशा ६ गाडया जप्त.
वाई पोलीस स्टेशन हद्दीत मोटार सायकल चोरीचे बरेच गुन्हे घडलेले असल्याने श्री. अजयकुमार
बन्सल, पोलीस अधिक्षक सातारा यांनी श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक, वाई पोलीस स्टेशन यांना वाहन
चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुशंगाने सुचना दिलेल्या होत्या. त्यानूसार श्री. बाळासाहेब भरणे यांनी
गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचा-यांना वारंवार सुचना देवून व मार्गदर्शन करुन वाहन चोरीतील आरोपींना
तात्काळ अटक करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानूसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी वाहन
चोरीतील आरोपींचा शोध घेत होते.
दिनांक २८/०७/२०२२ रोजी श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन यांना त्यांचे
खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन मुले काळे रंगाचे नंबर नसलेले मोपेड गाडीवरुन
संशयीतरित्या वाई शहरात फिरत आहेत. मोटार सायकल चोरीच्या वाढत्या गुन्हयांचे प्रमाण लक्षात घेवून
श्री. बाळासाहेब भरणे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचा-यांना सदर संशयीतांचा शोध घेणे
बाबत सुचना दिल्या. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी हे सदर इसमांचा शोध घेत असताना एका
काळे रंगाचे पाठिमागिल बाजूस नंबरप्लेट नसलेले मोपोड गाडीवरुन दोन्ही संशयीत सिध्दनाथवाडी, वाई येथे
फिरत असताना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी गेले १ महीण्याच्या
कालावधीत महाबळेश्वर येथून १ बुलेट व १ हिरो होंन्डा स्प्लेंन्डर मोटार सायकल तसेच वाई शहरातून ४
हिरो होंन्डा स्प्लेंन्डर मोटार सायकल अशा सुमारे ३,००,०००/- रुपये किंमतीचे ६ मोटार सायकल चोरलेल्या
असल्याचे मान्य केले. त्यांनतर त्यांनी सदरच्या मोटार सायकलपैकी काही मोटार सायकल दडवून ठेवलेल्या
होत्या व काही मोटार सायकल आई अज्जी अजारी असल्याने पैशाची गरज आहे असे कारण सांगून
विकलेल्या असल्याचे सांगितल्यानंतर सदरच्या सर्व मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर
बाबत वाई पोलीस स्टेशन व महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद आहेत. सदर गुन्हयाचा तपास पोलीस
नाईक सोनाली माने नेमणूक- वाई पोलीस स्टेशन या करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अजित बो-हाडे अपर पोलीस
अधीक्षक सातारा, श्री. तानाजी बरडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग, चार्ज वाई विभाग वाई
यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, पोलीस नाईक उमेश गहीण, महीला पोलीस नाईक सोनाली माने,
पो.कॉ. अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर. श्रावण राठोड, हेमंत शिंदे, अक्षय नेवसे केलेली आहे.
आरोपींची नावे.
१) प्रतिक लक्ष्मण भोसले वय १९ वर्षे धंदा-शिक्षण रा. शिक्षण रा. शिरगांव ता. वाई जि. सातारा.
२) हेमंत किशोर कदम वय १९ वर्षे रा. खेड (नांदगीरी) ता. कोरेगांव जि. सातारा