आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

आष्टी:-“कडा शहरात निषेध रॅलीला पोलिसांची परवानगी! सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ नागरिकांचा शांततापूर्ण एल्गार”

पत्रकार अमजद शेख बीड जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आष्टी:-“कडा शहरात निषेध रॅलीला पोलिसांची परवानगी! सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ नागरिकांचा शांततापूर्ण एल्गार”

कडा (ता. आष्टी, जि. बीड) | प्रतिनिधी :
सामाजिक कार्यकर्ते श्री. सोनम वांगचुक व श्री. अभिजित दीपक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कडा व परिसरातील नागरिकांच्या वतीने शांततापूर्ण निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सोनम वांगचुक यांना बळजबरीने उपोषणातून उठविण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या नागरिकांच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निषेध रॅलीसाठी आयोजकांच्या वतीने कडा पोलिसांकडे अधिकृत परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार पोलिस प्रशासनाकडून रॅलीसंदर्भात आवश्यक त्या सूचना व अटींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रस्तावित रॅलीची सुरुवात आंबेडकर चौक, कडा येथून होऊन बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, ग्रामपंचायत मार्ग, मुख्य रस्ता या मार्गाने पुन्हा आंबेडकर चौक येथे रॅलीची सांगता होणार आहे.
ही रॅली पूर्णपणे शांततापूर्ण व कायद्याचे पालन करून काढण्यात येणार असून, रॅलीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, याची आयोजकांनी पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच पोलिस प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचना व अटींचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या रॅलीसाठी पोलिस प्रशासनाने परवानगी दिल्याने कडा शहरात राजकीय व सामाजिक वातावरणात या निषेध रॅलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाही मार्गाने निषेध नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष : रॅलीसंदर्भातील निवेदनावर आयोजक व समर्थकांच्या स्वाक्षऱ्या असून, पोलिस प्रशासनाकडूनही परवानगी व आवश्यक सूचना देण्यात आल्याचे कागदपत्रावरून दिसून येते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button